शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

‘तोतया’ पोलिसाला कारंजा लाड पोलिसांनी घेतले ताब्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 23:52 IST

पोलिस असल्याची बतावणी करून दोघांना लुटणा-या आजमखान अफजलखान या आरोपीस शहर पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी अटक केली असून त्याच्याकडून सोने-चांदीच्या दागिण्यांसह ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देसोने-चांदीच्या दागिण्यांसह ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त विविध कलमांन्वये गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : पोलिस असल्याची बतावणी करून दोघांना लुटणा-या आजमखान अफजलखान (वय ५२ वर्षे, रा. मलकापूर पांग्रा, ता. शिनखेड, जि.बुलडाणा) या आरोपीस शहर पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी अटक केली असून त्याच्याकडून सोने-चांदीच्या दागिण्यांसह ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आजमखानविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी कारंजा शहरातील जयस्तंभ चौक ते बसस्थानकादरम्यान एका अनोळखी इसमाने पोलिस असल्याची बतावणी करून किसन शामराव कथे (वय ८०, रा. हिवरा लाहे) या शेतकºयाची ३३ हजार ५०० रूपयाने फसवणूक केली; तर दुसºया घटनेत २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कारंजा शहरातील सुदर्शन कॉलनीमधील वसंतराव गोंविदराव देसाई (वय ७६) हे कारंजा बायपासवरून स्टेट बँकेकडे पायी जात असताना मी पोलिस खात्यातील साहेब आहे, असे सांगून देसाई यांच्याजवळून नगदी २० हजार ५०० रुपये व ३० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा ५० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. वरील दोन्ही घटनांप्रकरणी कारंजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले होते. दरम्यान, २५ नोव्हेंबर रोजी आजमखान अफजल खान या आरोपीस त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील रोख रक्कम व सोन्याच्या अंगठ्या असा एकूण ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई अप्पर पोलिस अधिक्षक सपना गोरे, उपविभागील पोलिस अधीकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनखाली कारंजा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार एम.एम बोडखे यांच्या तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक पायघन, सहायक पोलिस उपनिरीक्षक ठोसरे, महाकाळ, राठोड व लडके यांनी केली.  

टॅग्स :Policeपोलिस