वाशिम - शहरात सुरु असलेल्या रस्ता, नालीसह ईतर कामांमुळे सर्वत्र धुळीने शहर माखले असून याचा नागरिकांना मोठया प्रमाणात त्रास होत आहे. कामे करतांना पाण्याचा वापर करण्याच मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.वाशिम शहरात मोठया प्रमाणात रस्त्याची कामे संथगतिने सुरु असल्याने व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक कामांची पूर्ण करण्याची वेळ निघुन गेली तरी सुध्द कामे अपूर्णच दिसून येत आहेत. संबधितांशी संपर्क केल असता मजबूत व टिकाऊ कामांसाठी विलंब होणर असे उत्तरे देवून पांघरुण घातल्या जात आहे. शहरातून वाहने चालवितांना नागरिकांना मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे. भरदिवसा रस्त्यांची कामे सुरु असल्याने सर्वत्र धूळ उडून नागरिकांच्या डोळयात जात आहे. सदर कामे रात्रीच्या वेळी पूर्ण करावीत व कामे करतांना पाण्याचा वापर करावा जेणे करुन धूळ उडणार नाही अशी मागणी नागरिकांमधून केल्या जात आहे.
धुळीने माखले शहर, नागरिकांना त्रास
By admin | Updated: May 15, 2017 14:04 IST