शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक अडचणींमुळे मोफत आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:28 IST

वाशिम जिल्ह्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याचे संकेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले. 

ठळक मुद्दे, आतापर्यंत वाटप झालेल्या प्रवेशाच्या जागा सोडून उर्वरीत रिक्त जागांसाठी उपरोक्त सुधारित व्याख्येप्रमाणे अर्ज मागविण्यात आले. मात्र, १२ जूनपासून तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने अर्ज सादर करणे अशक्य झाले आहे.१३ जून रोजीदेखील पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज सादर करता आले नाहीत.

वाशिम : मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार, आता २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतील ‘वंचित गट व दुर्बल गटा’च्या व्याख्येत बदल करण्यात आले असून, उर्वरीत प्रवेश प्रक्रिया या नवीन व्याख्येनुसार पार पडणार आहे. मात्र, १२ जूनपासून वाशिम जिल्ह्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याचे संकेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले. शिक्षण हक्क कायद्याने दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. वंचित गट व दुर्बल गटासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त वि.जा. (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (ओबीसी) व विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) यांचा समावेश करण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे अनुषंगाने एचआयव्ही बाधित, एचआयव्ही प्रभावित बालकांचाही समावेश केला. उपरोक्त सुधारणेप्रमाणे शिक्षण विभागाने मोफत प्रवेश प्रक्रियेत ‘वंचित गट व दुर्बल गटा’च्या व्याख्येत बदल केले असून, आतापर्यंत वाटप झालेल्या प्रवेशाच्या जागा सोडून उर्वरीत रिक्त जागांसाठी उपरोक्त सुधारित व्याख्येप्रमाणे अर्ज मागविण्यात आले. याची अंतिम मुदत १३ जून अशी करण्यात आली आहे. यापूर्वी ज्या बालकांना, पालकांना सदर योजनेचा अर्ज भरता आलेला नाही, त्यांनाही सदर आॅनलाईन प्रणालीमध्ये अर्ज भरता येणार आहे. मात्र, १२ जूनपासून तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने अर्ज सादर करणे अशक्य झाले आहे. १३ जून रोजीदेखील पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज सादर करता आले नाहीत. तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ही समस्या उदभवली, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली जाईल, असे शिक्षण विभागाने सांगितले. जिल्ह्यात मोफत प्रवेशासाठी ११७३ जागा असून, आतापर्यंत ७२२ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली असून, ५२६ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. उर्वरीत प्रवेश नवीन पद्धतीनुसार होणार आहेत.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा