शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

अचूक बँक खात्याअभावी अतिवृष्टीची रक्कम शासनजमा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 17:11 IST

मुदतीत उपरोक्त कार्यवाही झाली नाही तर शिल्लक रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.

वाशिम : अमरावती विभागात आॅक्टोबर-नोव्हेंबर-२०१९ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाईची रक्कम शासनाने विविध टप्प्यात जिल्हास्तरावर मार्चपूर्वी वितरीत केली. बँक खात्यातील चुका व अन्य कारणामुळे अजूनही ८ टक्के शेतकरी यापासून वंचित राहिले. वंचित शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत संबंधित तलाठ्यांकडे आवश्यक ती कागदपत्रे देऊन नुकसानभरपाईचा लाभ घेता येईल. या मुदतीत उपरोक्त कार्यवाही झाली नाही तर शिल्लक रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.राज्यात आॅक्टोबर-नोव्हेबर २०१९ मध्ये ‘क्यार’ व ‘महा’ चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जोरदार अवकाळी पाऊस पडून राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांच्या २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवरील ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. नुकसानापोटी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांना टप्प्याटप्प्याने निधी मिळाला. आतापर्यंत ९२ टक्के शेतकºयांच्या बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत ८ टक्के शेतकºयांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर न केल्याने तसेच अचूक बँक क्रमांक, आधार क्रमांक न दिल्याने ही रक्कम शेतकºयांपर्यंत पोहचू शकली नाही. वंचित शेतकºयांना नुकसानभरपाईचा लाभ देण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली असून, १५ जूनपर्यंत या शेतकºयांना आपले बँक खाते क्रमांक व आधारकार्डची छायांकीत प्रत संबंधित तलाठ्यांकडे जमा करावी लागणार आहे. त्याऊपरही कुणी तलाठ्याशी संपर्क साधला नाही तर शिल्लक राहिलेली रक्कम ही ३० जून रोजी शासनाकडे परत केली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र