शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जैनांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरपुरात भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 18:41 IST

जैनांची काशी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथील संस्थानमध्ये दर्शनासाठी परप्रांतीय भाविकांची मांदियाळी दिसत आहे. श्वेतांबर संस्थानमधील आवश्यक सोयीसुविधांमुळे दिवसाकाळी हजाराच्याव परप्रांतीय भाविक या ठिकाणी दाखल होत असल्याने गावातील विविध व्यवसांयानाही झळाळी आली आहे.

ठळक मुद्देसोयीसुविधांचा परिणामगावातील व्यवसायांना आली झळाळी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: जैनांची काशी म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथील संस्थानमध्ये दर्शनासाठी परप्रांतीय भाविकांची मांदियाळी दिसत आहे. श्वेतांबर संस्थानमधील आवश्यक सोयीसुविधांमुळे दिवसाकाळी हजाराच्याव परप्रांतीय भाविक या ठिकाणी दाखल होत असल्याने गावातील विविध व्यवसांयानाही झळाळी आली आहे.शिरपूर जैन येथील जगप्रसिद्ध अंतरीक्ष पार्श्वनाथ मंदिर श्वेतांबर आणि दिगंबर पंथांमधील वादामुळे १९८२ पासून बंद आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी पोलिसांच्या बंदोबस्तातच मूर्ती पुजेसाठी हे मंदीर उघडले जाते. दोन्ही पंथांचे पुजारी दूरवरूनच पुजा करीत असतात, तर इतर भाविक एका खिडकीतून भगवान अंतरिक्ष पार्श्वनाथांच्या मुर्तीचे दर्शन घेत असतात. याच कारणामुळे या ठिकाणी येणाºया जैन भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती; परंतु मागील तीन वर्षांत श्वेतांबर संस्थानने स्थानिक पारसबाग संकुलात भव्य असे सात भक्तनिवास उभारले, सुसज्ज भोजनशाळा आणि भक्ती इमारतही उभारली. एकाच दिवशी जवळपास दोन हजारांहून अधिक भाविक या ठिकाणी आरामात राहू शकतात. त्यामुळे गत काही दिवसांपासून येथे पुन्हा भाविकांची गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. योग्य सोयीसुविधा उपलब्ध झाल्याने या ठिकाणी गेल्या वर्षभरात ७५ हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. यात परप्रांतीय भाविकांची संख्या मोठी असून, यामुळे गावातील विविध व्यवसायांना झळाळी आली आहे. गावातील लोकांनाही रोजगार उपलब्ध होत आहेत. दूध, फळे, मिनरल वॉटर, पुजेचे साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. 

टॅग्स :washimवाशिम