शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळा:  भर जहॉगिर परिसरातील तलाव कोरडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 17:56 IST

भर जहॉगिर (वाशिम) : रिसोड तालुक्यातील भर जहॉगिर परिसरात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. उन्हाळ्याला अद्याप पाच महिने वेळ असताना परिसरातील तलाव कोरडे ठण झाले आहेत.

- अशोक चोपडे

लोकमत न्यूज नेटवर्कभर जहॉगिर (वाशिम) : रिसोड तालुक्यातील भर जहॉगिर परिसरात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. उन्हाळ्याला अद्याप पाच महिने वेळ असताना परिसरातील तलाव कोरडे ठण झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, जनावरांच चारा, पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.रिसोड तालुक्यात यंदा वार्षिक सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला. त्यामुळे शेती उत्पादन घटले आणि पाण्याची पातळी खोल गेल्याने तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्यामुळेच शासनाने या तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. तथापि, तालुक्यातील काही मंडळातील परिस्थिती त्यापेक्षाही गंभीर असून, अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, रब्बी पिकेही संकटात सापडली आहेत, तसेच जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यात भर जहॉगिर परिसराचा समावेश आहे. परिसरातील  सोनारी पाझर तलाव, मोरगव्हाण लघू सिंचन तलाव, भर जहॉगिर येथील आसरा माता तलावात सद्यस्थितीत पाण्याचा थेंबही नसून, मांगवाडी, गणेशपूर, शेलुखडसे, कंकरवाडी, मांडवा, चाकोली, मोप, आसोला, मोहजा बंदी आदि ठिकाणचे तलाव, प्रकल्प, हिवाळ्यातच कोरडे पडत चालले आहेत.  त्यामुळे परिसरातील शेतकºयांची गहू, हळद, हरभरा आदि पिके संकटात सापडली आहेत.  विहिरी, कूपनलिकांची पातळी खोलरिसोड तालुक्यात आधीच पाऊस कमी झाला असताना भर जहॉगिर परिसरात पावसाचे प्रमाण त्याहून अल्प आहे. त्यामुळेच परिसरातील जलप्रकल्पांनी हिवाळ्यात तळ गाठला असून, गावागावातील विहिरी आणि कूपनलिकांची पातळीही प्रचंड खालावली आहे. ऐन हिवाळ्यातच ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. याची दखल शासन, प्रशासनाने घेऊन या ठिकाणी तीव्र दुष्काळ जाहीर करावा आणि ग्रामस्थ, शेतकरी व जनावरांसाठी दुष्काळी सुविधांची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी