शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुजलाम, सुफलाम अभियान वांध्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 15:16 IST

वाशिम : जिल्हा दुष्काळमूक्त करण्याच्या उद्देशाने राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने ( बीजेएस ) राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानाची सफलता प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अडचणीत आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा दुष्काळमूक्त करण्याच्या उद्देशाने राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्यावतीने ( बीजेएस ) राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानाची सफलता प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अडचणीत आली असून, या अभियानात डिझेलच्या दराची अडचण समोर करून प्रशासन हात झटकत असल्याने जलसंधारणाच्या कामांसाठी बीजेएसकडून उपलब्ध करण्यात आलेल्या २३ जेसीबी आणि ९ पोकलन मशीन महिनाभरापासून उभ्या आहेत.   महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य शासन आणि बीजेएस दरम्यान सामंजस्य करार झाला आहे. या नुसार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात येत असून, यात वाशिम जिल्ह्याचाही समावेश आहे.. या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यासाठी बीजेएसच्या वतीने जेसीबी, पोकलन मशीन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, तर राज्य शासन डिझेल खर्च देत आहे. जलसंधारण विभाग, कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, वनविभाग आणि महसूल विभागाच्यावतीने ही कामे करण्यात येत आहेत, यासाठी  बीजेएसने वाशिम जिल्ह्यात ३० जेसीबी आणि १३ पोकलन उपलब्ध करण्यात आल्या आहेत . या मशीनच्या आधारे साठवण तळे, नाला- खोलीकरण, खोल समतल चर आदि कामे महिनाभरापासून करण्यात येत आहेत. तथापि, तांत्रिक अडचणीमुळे ही कामे बंद पडली आहेत. त्यामुळे या कामांसाठी असलेल्या मशीनच्या आधारे ढाळीच्या बांधाची कामे केली जाऊ शकतात आणि तसे शासनाचे निर्देशही आहेत; परंतु या कामांसाठी डिझेलचा खर्च अधिक येत असून, शासनाच्या दरापेक्षा अधिक खर्च होत असल्याचे कारणसमोर करून कृषी विभागासह इतर विभाग ही कामे करण्यास उदासीन असल्याने बीजेएसच्या २३ जेसीबी मशीन आणि २ पोकलन मशीन महिनाभरापासून उभ्या आहेत. यात कारंजा तालुक्यात ५ जेसीबी आणि २ पोकलन, वाशिम तालुक्यात १० जेसीबी, मंगरूळपीर तालुक्यात ४ जेसीबी आणि मालेगाव तालुक्यातील ४ जेसीबी मशीनचा समावेश आहे.  प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सुजलाम, सुफलाम अभियानाची सफलता अडचणीत आली आहे.

टॅग्स :washimवाशिम