शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

डिझेलच्या उपलब्धतेनंतर ‘सुजलाम, सुफलाम’ जोरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 16:19 IST

वाशिम: डिझेलच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यात सुजलाम, सुफलामची कामे खोळंबली होती. जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेऊन डिझेल उपलब्ध केल्यानंतर चार दिवसांपासून या अभियानातील जलसंधारणाच्या कामांनी पुन्हा वेग धरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: डिझेलच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यात सुजलाम, सुफलामची कामे खोळंबली होती. जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घेऊन डिझेल उपलब्ध केल्यानंतर चार दिवसांपासून या अभियानातील जलसंधारणाच्या कामांनी पुन्हा वेग धरला असून, वाशिम तालुक्यातील ब्रम्हा येथे कृषीविभागाच्यावतीने सुरू असलेले नाला खोलीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.राज्यशासन आणि बीजेएसच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानाच्या कामांत डिझेल उपलब्ध होत नसल्याने खोडा निर्माण झाला होता. त्यामुळेच बीजेएसने उपलब्ध केलेल्या मशीनही उभ्या राहिल्या होत्या. ही समस्या कृषी विभाग आणि महसूल विभागासह संबंधित विभागांनी जिल्हाधिकाºयांकडे मांडल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी जलसंधारणाची कामे थांबू नयेत म्हणून तहसीलस्तरावर सुचना केल्या. त्या सुचनानुसार वाशिमच्या तहसीलदारांसह इतर ठिकाणी डिझेल उपलब्ध करण्यास तहसीलदारांनी पुढाकार घेतला. त्यामुळे सुजलाम, सुफलामची कामे पुन्हा जोरात सुरू झाली आहेत. यात ढाळीच्या बांधांची कामे करण्यात येत असून, वाशिम तालुक्यातील ब्रम्हा येथे आठवडाभरापूर्वी सुरू करण्यात आलेले नाला खोलीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी बीजेएसकडून एक पोकलन मशीनही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी कृषी सहाय्यक सुनील एकाडे, कृषी पर्यवेक्षक मधुकर राऊत, मंडळ कृषी अधिकारी सुभाष उलेमाले हे परिश्रम घेत आहेत. त्याशिवाय देवठाणा बु. येथे कृषी सहाय्यक मिनाक्षी तायडे, कृषी पर्यवेक्षक प्रवीण उलेमाले, मंडळ कृषी अधिकारी श्री सुभाष उलेमाले यांच्या मार्गदर्शनात ढाळीच्या बांधाचे काम आणि चिखली येथे कृषी सहाय्यक मधुकर दंडे, मंडळ कृषी अधिकारी अनिल कंकाळ यांच्या मार्गदर्शनात डीप सीसीटीचे काम करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिम