शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माझा परिवार विकत घ्या, पण माझी शेती जगवा!; शेतकऱ्याची ठाकरे सरकारला आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 12:35 IST

सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील विजय पंडीतराव शेंडगे या शेतकºयाने आपले कुटुंबच विक्रीला काढले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव (वाशिम) : दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पाऊस यामुळे आर्थीक नुकसान ढासळले असतांना शेतकºयांच्या प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. गत तीन वर्षांपासून अस्मानी-सुल्तानी संकटामुळे  शेतीचे, पीकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असतांना सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने मालेगाव तालुक्यातील कोळगाव येथील विजय पंडीतराव शेंडगे या शेतकºयाने आपले कुटुंबच विक्रीला काढले. त्यांनी चक्क आपल्या शेतात ‘माय बाप सरकार माझा परिवार विकत घ्या, पण माझी शेती जगवा असे फलक लावून संपूर्ण कुटुंबच शेतात जावून बसले आहे.

युती सरकारच्या काळात कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, पीक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळाली नाही. दुष्काळी परिस्थिती आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले पीक गेले आहे. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, अशा परिस्थितीत सरकारकडूनही दिलासा मिळत नसल्याने शेतकरी शेडगे हताश झाले आहेत. २३ डिसेंबरपासून त्यांनी आपल्याला न्याय दयावा याकरिता तहसील कार्यालयासमारे अन्नत्याग आंदोलन केले परंतु एकानेही याकडे ढुंकून पाहीले नसल्याने अखेर सदर निर्णय त्यांनी घेतला असल्याचे सांगितले. आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली असून, सरकारने शेतकरी विरोधी धोरणात बदल करावा, शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे, नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी द्यावी, आर्थिक दिलासा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी शेतातच हे आगळे वेगळे आंदोलन सुरु केले आहे. निवेदनालाही केराची टोपलीगत तीन वर्षांपासून होत असलेले नुकसान पाहता व शेतकºयांसाठी कोणतेही हिताचे निर्णय न घेतल्याने २३ डिसेंबरपासून सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला साधी कोणी भेट न देणे तसेच तहसीलदार रवी काळे यांना निवेदन देऊन त्याची साधी दखल न घेता त्याला केराची टोपली दाखविल्याबद्दल शेतकरी शेंडगे कुटुंबाने प्रशासनाविरुध्दही रोष व्यक्त केला. शेतकरी कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दरवर्षी उदभवणाºया नुकसानामुळे शेती कशी करावी असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित होत आहे. त्यात सरकारनेही शेतकºयांना वाºयावर सोडल्याने आपले हे अनोखे आंदोलन आहे.- विजय शेंडगेशेतकरी, कोळगाव

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी