शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

डाळिंबाची बाग सुकल्याने शेतक-याचं 20 लाख रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 14:48 IST

गतवर्षीच्या अपु-या पावसाचा फळपिकांना चांगलाच फटका बसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी डिगांबर गिरी यांची डाळिंबाची बाग पाण्याअभावी सुकल्याने त्यांचे तब्बल 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

वाशिम - गतवर्षीच्या अपु-या पावसाचा फळपिकांना चांगलाच फटका बसत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी डिगांबर गिरी यांची डाळिंबाची बाग पाण्याअभावी सुकल्याने त्यांचे तब्बल 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील प्रगतशील शेतकरी डिगांबर गिरी फळपिकांची शेती करतात. त्यांनी यासाठी शेतात भव्य असे शेतततळेही खोदले आहे.  याच शेत तळ्याच्या आधारे त्यांनी विक्रमी उत्पादनही घेतले आहे. टरबूज, डाळिंब, पपई आदि फळपिकांसह काकडी, फुलकोबी, सिमला मिरची आदि भाजीपाला पिकेही ते घेत असताज. अंगी असलेली कृतीलता, नियोजन आणि कृषी अधिका-यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आपल्या शेतात 8 एकर क्षेत्रात डाळिंबाची बाग फुलवित. 

या बागेतून पिकविलेली डाळिंब थेट दुबईपर्यंतही विकली आहेत. तथापि, गतवर्षी झालेल्या अपुºया पावसाचा मोठा फटका त्यांना सहन करावा लागला आहे. शेततळ्यात पुरेसा जलसाठाच उरला नसल्याने आपल्या 20 पेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांना या शेततळ्याच्या आधारे जगविणे त्यांना कठीण झाले. यामुळेच त्यांची 8 एकरातील डाळिंबाची फळे धरलेली बाग पूर्णपणे सुकून, त्यांचे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.