शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळसदृश परिस्थिती; तरीही कृषीपंप जोडणी खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 17:35 IST

वाशिम : रिसोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे, मानोरा तालुक्यातील उमरी महसूल दुष्काळी सवलती लागू केल्या असतानाही थकित वीज देयकावरून कृषीपंप जोडणी खंडीत करण्याचे प्रकार सुरू आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रिसोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे, मानोरा तालुक्यातील उमरी महसूल दुष्काळी सवलती लागू केल्या असतानाही थकित वीज देयकावरून कृषीपंप जोडणी खंडीत करण्याचे प्रकार सुरू आहेत.  दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने महावितरणने कृषीपंप जोडणी खंडीत करू नये अन्यथा तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी दिला.यावर्षी अनेक तालुक्यांमध्ये तसेच महसूल मंडळात जून ते सप्टेंबर या दरम्यान पावसाने सरासरी गाठली नाही. कमी पर्जन्यमान झाल्याने उत्पादनात घट आली. शेतकºयांसह सर्वसामान्य जनतेला दिलासा म्हणून शासनाने जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात तसेच मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे तसेच मानोरा तालुक्यातील उमरी महसूल मंडळात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून दुष्काळी सवलती लागू केल्या आहेत. जऊळका रेल्वे महसूल मंडळात १६ गावांचा समावेश आहे. उमरी महसूल मंडळात १५ पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकºयांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडीत न करणे आदी सवलतींचा समावेश आहे. प्रत्यक्षात दुष्काळी सवलतींची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याने या सवलतींचा लाभ केव्हा मिळणार? असा प्रश्न पडला आहे. थकित वीज देयकावरून कृषीपंप जोडणी खंडीत केली जात आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. कृषीपंप जोडणी खंडीत करू नये अन्यथा शेतकºयांसह आंदोलन छेडण्याचा इशारा विश्वनाथ सानप यांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती