शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममधील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहाला डॉ. विकास महात्मे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 18:04 IST

वाशिम : खासदार डॉ. विकास महात्मे यांनी वसतिगृहाला भेट दिली असता, त्याठिकाणी सुरक्षा रक्षक अथवा एकही कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले. यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील सिव्हिल लाईनस्थित मुलींच्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील गृहपालाच्या पतीने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध १७ जानेवारीला गुन्हे दाखल झाले. एवढ्या गंभीर स्वरूपातील घटना घडूनही वसतिगृहाच्या ढेपाळलेल्या कारभारात कुठलीच सुधारणा झाली नसून रविवार, २० जानेवारीला खासदार डॉ. विकास महात्मे यांनी वसतिगृहाला भेट दिली असता, त्याठिकाणी सुरक्षा रक्षक अथवा एकही कर्मचारी हजर नसल्याचे दिसून आले. यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.वसतिगृहातील गृहपाल महिलेचा पती रविकांत पेठकर हा गेल्या अनेक दिवसांपासून छळ करित होता. त्याने १७ जानेवारीला वाईट उद्देशाने आपला हात धरून विनयभंग केला. तसेच याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पेठकर यास अटक करून त्याच्याविरूद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. दरम्यान, या गंभीर स्वरूपातील घटनेनंतर वसतिगृहाचा कारभार सुधारायला हवा होता. मात्र, वाशिममधील धनगर समाजाच्या आक्रोश महामेळाव्यासाठी आलेले डॉ. विकास महात्मे यांनी अचानक वसतिगृहाला भेट दिली असता, त्याठिकाणी मुलींशिवाय वसतिगृहाचा एकही कर्मचारी हजर नसल्याचे आढळले. पाहणीदरम्यान वसतिगृहातील प्रत्येक खोलीत ३० ते ३५ मुलींना वास्तव्य करावे लागत असून अन्य स्वरूपातील अनेक समस्या सद्या त्याठिकाणी उद्भवल्याचे डॉ. महात्मे यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी वसतिगृहातील मुलींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहचविण्यात येतील, अशी ग्वाही दिली.

टॅग्स :washimवाशिमVikas Mahatmeविकास महात्मे