शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस घेण्यास डॉक्टर, आरोग्य कर्मचारी उत्सुक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 11:17 IST

Corona vaccine News जिल्ह्यातील डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी मात्र ही लस घेण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्दे ५३२४ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. स घेण्यास काहीच हरकत नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना लस लवकरच येण्याची शक्यता असून, पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून सेवा बजावणारे डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.  साइड इफेक्टच्या भीतीमुळे अन्य काही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ही लस घेण्यास डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक असली तरी जिल्ह्यातील डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी मात्र ही लस घेण्यास उत्सुक असल्याचे दिसून येते. देशात मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला.  जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. नोव्हेंबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात कोरोनाची लस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यात फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून सरकारी  व खासगी क्षेत्रातील ५३२४ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सरकारी डाॅक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या ३८९०, तर खासगी डाॅक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या १४३४ अशी आहे.  या फ्रंटलाइन वर्कर्सला पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना लसीचे काही साइड इफेक्ट होऊ शकतात, अशी भावना अन्य जिल्ह्यातील काही डाॅक्टर, कर्मचाऱ्यांची झाल्याने पहिल्या टप्प्यात लस घेण्याची धाकधूक आहे. हा धागा पकडून जिल्ह्यातील सरकारी व खासगी डाॅक्टरांची मते जाणून घेतली असता, पहिल्या टप्प्यात कोरोना लस घेण्यास काहीच हरकत नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. आगामी काळात कोरोना लस उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नियोजन केले जात आहे. सरकारी व खासगी डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची कोरोना लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे.  - डाॅ. अविनाश आहेर जिल्हा आरोग्य अधिकारी

कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येतात.  कोरोना लस लवकरच येणार, असे सांगण्यात येत आहे. कोरोना लस घेण्यास जिल्ह्यात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा विरोध नाही.- डाॅ. अनिल कावरखे, इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष

टॅग्स :washimवाशिमCorona vaccineकोरोनाची लस