शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात आरोग्य सेवा होतेय प्रभावित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:09 IST

आतापर्यंत २५ जणांना कोरोना संसर्ग झाला असून गत चार, पाच दिवसात १० जण कोरोनाबाधित झाले.

वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने आरोग्य सेवाही काही प्रमाणात प्रभावित होत असल्याचे दिसून येते. आतापर्यंत २५ जणांना कोरोना संसर्ग झाला असून गत चार, पाच दिवसात १० जण कोरोनाबाधित झाले. त्यांच्या संपर्कातील जवळपास १५ जणांचे थ्रोट स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हावासियांची चिंताही वाढली. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालयातील कोविड केअर सेंटर तसेच तालुकास्तरावर कोविड केअर सेंटरची सुविधा उपलब्ध आहे. जिल्ह्यात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकूण ४४९ पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून, सरकारी व खासगी रुग्णालयातील जवळपास २५ जणांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला. यामध्ये डॉक्टर आणि कर्मचाºयांचाही समावेश आहे. एकिकडे नागरिकांना मोठ्या संख्येने कोरोना संसर्ग होत असतानाच, दुसरीकडे डॉक्टर, कर्मचाºयांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याने आरोग्य सेवा काही अंशी प्रभावित होत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात अधिकारी, कर्मचाºयांची रिक्त पदे भरणे, जिल्हा सामान्य रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये ‘फिजिशियन’ची आणखी काही पदे निर्माण करणे आवश्यक ठरत आहे. खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याची तयारीही प्रशासनातर्फे सुरू आहे. याला कितपत यश येते, हे लवकरच स्पष्ट होईल. कोरोनावर मात करताच ‘एकमेक’ फिजिशयन सेवेत रूजूजिल्हा सामान्य रुग्णालयात एकमेव फिजियशन आहेत. कोरोनाबधित रुग्णांवर निगराणी, उपचार करण्याची धुरा ते सांभाळत आहेत. मध्यंतरी त्यांनाही कोरोना संसर्ग झाला होता. कोरोनावर मात करताच ते पुन्हा रुग्णसेवेत रूजू झाले. जिल्ह्याचे ठिकाणी असलेल्या वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोनाच्या काळात आणखी दोन ते तीन फिजिशियन असणे आवश्यक ठरत आहे.

‘कॉल आॅन’ संदर्भात चर्चाएकिकडे कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे आरोग्य विभागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने काही अंशी आरोग्य सेवा प्रभावित होत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांची सेवा ‘कॉल आॅन’ स्वरुपात उपलब्ध करून घेण्याबाबत आरोग्य विभागाची डॉक्टरांच्या संघटनेसोबत चर्चा सुरू आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उपलब्ध मनुष्यबळ आणि सुविधा यानुसार रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोरोनाच्या काळात ‘कॉल आॅन’ स्वरुपात खासगी डॉक्टरांची सेवा घेण्याच्या सूचना पालकमंत्री महोदयांनी केल्या. त्यानुसार ‘आयएमए’शी चर्चा सुरू आहे.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर