शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांची दिवाळी जाणार अंधारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 17:15 IST

Washim News मानधन मिळण्याच्या दृष्टिने प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली नसल्याने संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - ‘आपले सरकार प्रकल्पा’च्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत अनेक संगणक परिचालकांना गत  चार वर्षांपासून मानधन मिळाले नाही. दिवाळीच्या ऐन तोंडावरही मानधन मिळण्याच्या दृष्टिने प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली नसल्याने संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्याच्या ग्राम विकास विभागांतर्गत ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर संगणक परिचालक कार्यरत आहेत. हा प्रकल्प राबविणाऱ्या कंपनीच्या चुकीचा धोरणाचा फटका संगणक परिचालकांच्या मानधनाला बसत असल्याचा आरोप संघटनेचे वाशिम तालुकाध्यक्ष शेखर हिरगुडे यांनी निवेदनाद्वारे केला. २०१७ ते ऑक्टोबर २०२० पर्यंतचे मानधन शासनाकडे थकीत आहे. संगणक परिचालकांना वर्ष वर्ष मानधन मिळत नाही. कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे सीएससी-आयडी तसेच ‘झिरो अमाऊंट कॅल्क्युलेट’च्या नावाखाली संगणक परिचालकांना मानधन दिले जात नाही. अनेकांचे फक्त पॅन कार्ड नसल्याचे कारण देत प्रती महिना १२०० रुपये मानधन कपात करण्यात आले. हा एकप्रकारे संगणक परिचालकांवर अन्याय असून, या अन्यायाविरोधात दिवाळीदरम्यान जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही संगणक परिचालक संघटनेने निवेदनाद्वारे दिला. कोरोना काळात संगणक परिचालकांनी कोविड योद्धा म्हणून काम केले आहे. परंतु शासनाकडून १००० रुपये भत्ता सुद्धा मिळाला नाही. या दिवाळीपुर्वी सर्व थकीत मानधन देण्यात यावे अन्यथा जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करून ‘शिमगा आंदोलन’ करणार असल्याचे हिरगुडे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम