शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

१६ हजार ८०८ मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 15:59 IST

या मोहीमे अंतर्गत एकुण १६ हजार ८०८ मुला मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  राष्ट्रीय जंतनाशक  दिवशी आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळ्या वाटप मोहीम राबवून १ ते १९ वर्षेे वयोगटातील  मुला मुलींना   जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात येते. यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, अंगणवाडी, एकात्मिक महिला व बालविकास विभाग, शाळा, महाविद्यालये व्यवस्थापन समिती यांची मदत घेतल्या जाते. यंदा वाशिम जिल्ह्याकरिता सुमारे ३ लाख ७९ हजार मुला मुलींना जंतनाषक गोळ्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टपुर्तीच्या पार्श्वभुमीवर कारंजा उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने ८ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळ्या वाटप मोहीम राबविण्यात आली. या मोहीमे अंतर्गत एकुण १६ हजार ८०८ मुला मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार कारंजा उपजिल्हा रूग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय जंतनाशकदिनाचे औचित्य साधून कारंजा शहरातील ५२ शाळा व संपुर्ण अंगणवाड्या, यासह इतर ठिकाणी जंतनाशक गोळ्यावाटप मोहीम राबविण्यात आली. सदर मोहीमेकरिता शासनाच्या वतीने २१ हजार २७४ गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी १६ हजार ८०८ गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यापैकी १३ हजार ६३१ गोळ्या ५२ शाळेत, २ हजार ९८२ गोळ्या सर्व अंगणवाडीत तर १९६ गोळ्यांचे इतर ठिकाणी वाटप करण्यात आले. ८ आॅगस्ट रोजी सदर मोहीमेत गैरहजर असणाºया मुलामुलींना १६ आॅगस्ट रोजी जंतनाशक गोळ्या वितरीत करण्यात आल्यात. त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली  असल्याची माहिती कारंजा उपजिल्हा रूग्णालयातील आरोग्य सहायक कुंदन जाधव यांनी दिली आहे.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा