शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पेंडगाव येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 14:39 IST

रिसोड  : तालुक्यातील पेंडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच भारत माध्यमिक शाळा चिंचांबापेन मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम विठ्ठलराव सरनाईक व दानशुर व्यक्तीमत्व संतोष मुंदडा यांच्या पुढाकारातुन घेण्यात आला.

ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते दोन्ही शाळेतील अनेक होतकरु विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड  : तालुक्यातील पेंडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच भारत माध्यमिक शाळा चिंचांबापेन मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम विठ्ठलराव सरनाईक व दानशुर व्यक्तीमत्व संतोष मुंदडा यांच्या पुढाकारातुन घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तात्याराव देशमुख  तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य स्वप्नील सरनाईक, माजी मुख्याध्यापक रामचंद्र जाधव, मुख्याध्यापक गजानन बानोरे, मुख्याध्यापक बोरकर, संजय सरनाईक, रामदास पौळकर, बबन आल्हाट, डिगांबर गुºहाळकर, प्रभाकर सरनाईक, हिंमतराव सरनाईक, सिताराम जाधव, सै. आसद सै. यासिन, एन.डी. सरनाईक, संतोष मुंदडा, अनंता लांभाडे, नागेश गव्हाळे, उत्तम वाणी, डॉ. बालासाहेब कालापाड उपस्थित होते. सर्वप्रथम व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. जि.प. शाळेच्या वतीने व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात शिक्षक कालापाड यांनी सांगीतले की, दानशूर व्यक्तीमत्व संतोष मुंदडा यांच्याकडून दरवर्षी अनेक शाळेतील होतकरु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, वह्या, पुस्तकांचे वाटप करण्यात येते.  व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दोन्ही शाळेतील अनेक होतकरु विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बोलतांना माजी मुख्याध्यापक रामचंद्र जाधव म्हणाले की, संतोष मुंदडा यांचा हा उपक्रम फारच चांगला असून इतर व्यक्तींनी सुध्दा मुंदडा यांच्याकडून प्रेरणा घेवून असे उपक्रम राबवावे. या कार्यक्रमात जि.प. शाळेतील शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, भा.मा. शाळा चिंचांबापेन येथील विद्यार्थी, पेंडगाव येथील गावकरी मंंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन के.के. कालापाड यांनी तर आभार शिक्षक शिंदे यांनी मानले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाRisodरिसोड