भूमिपूत्र शेतकरी संघटनेची बैठक
वाशिम : भूमिपूत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च राेजी सकाळी ११ वाजता संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयात सभेचे आयाेजन करण्यात आले आहे. यावेळी शेतकरी समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे.
शेलुत नागरिकांचा मुक्तसंचार
वाशिम : काेराेना बाधित वाढत असताना प्रशासनाकडून गर्दी टाळण्याचे, मास्क वापरण्याचे आवाहन केल्या जात असताना शेलुबाजार येथे नागरिकांचा बाजारपेठेत मुक्तसंचार दिसून येत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून केली जात आहे.
जऊळका येेथे एक्स्प्रेस थांबा द्या
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे स्टेशनवर एक्स्प्रेस रेल्वेला थांबा देण्याची मागणी परिसरातील गावातील महिलांना जागतिक महिला दिनी महाप्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. इतर सुविधाही उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
कर्ज भरणाऱ्यांना अनुदान द्या
ताेंडगाव : नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राेत्साहन अनुदान देण्यात यावे अशी मागणी सहकार नेते दामू अण्णा गाेटे यांनी राज्य शासनाकडे पाठविलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देऊन दिलासा देण्याची मागणीही गाेटे यांनी निवेदनातून केली आहे.