शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

निवड रद्द झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांची विभागीय आयुक्तांकडे  धाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 15:50 IST

जिल्हयातील २५१ ग्रामपंचायतींच्या एकूण ६५६ सदस्यांची निवड ही भूतलक्षी प्रभावाने रद्द झाल्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १ जानेवारीला काढले आहेत. या आदेशाविरोधात अनेक सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राखीव प्रवर्गातून निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया जिल्हयातील २५१ ग्रामपंचायतींच्या एकूण ६५६ सदस्यांची निवड ही भूतलक्षी प्रभावाने रद्द झाल्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी १ जानेवारीला काढले आहेत. या आदेशाविरोधात अनेक सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली असून, अनेकांना अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती मिळाली असून, सदर प्रकरण सुनावणीकरीता वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या.जिल्ह्यात नोव्हेंबर २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया एकूण २८७ पैकी २७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ आॅक्टोबर २०१७ तर १४ ग्रामपंचायतींसाठी २७ आॅक्टोबर २०१७ रोजी मतदान झाले होते. राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या जिल्ह्यातील २५१ ग्रामपंचायतींच्या ६५६ सदस्यांनी तहसिलदारांकडे  विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.  विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या ६५६ सदस्यांची पदे भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिश्रा यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती मिळावी याकरीता अनेक सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली आहे. काही जणांना स्थगिती मिळाली असून, सदर प्रकरणावर २२ जानेवारीला सुनावणी होणार आहे.मालेगाव तालुक्यातील पांगरखेड येथील फालंगा माणिक पवार यांनी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला स्थगिती मिळावी याकरीता विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता. या अर्जाच्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १६ (२) अन्वये अंतिम निर्णयापर्यंत स्थगिती देण्यात येत असल्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी ८ जानेवारी रोजी दिले असून, सदर प्रकरणावर २२ जानेवारी २०१९ रोजी सुनावणी होणार आहे. डव्हा येथील रविराज अशोक गायकवाड यांनीदेखील स्थगिती मिळावी याकरीता विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. यावर स्थगिती मिळाली असून, सदर प्रकरणावरदेखील २२ जानेवारी २०१९ रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत