शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘नेट कनेक्टीव्हिटी’अभावी कार्यालयीन कामांचा खोळंबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 13:55 IST

शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवार, १६ डिसेंबरपासून ‘नेट कनेक्टीव्हिटी’ नसल्याचे फलक झळकत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : हल्ली सर्वच कामे आॅनलाईन स्वरूपात झाली असून मालमत्ता खरेदी-विक्री प्रकरणांचे कामकाज चालणाºया दुय्यम निबंधक कार्यालयात तर संगणक आणि इंटरनेटशिवाय कुठलेच काम होणे अशक्य झाले आहे. असे असताना पुरेशा गतीने ‘नेट कनेक्टीव्हिटी’ न मिळण्याची समस्या कायमच असून शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवार, १६ डिसेंबरपासून ‘नेट कनेक्टीव्हिटी’ नसल्याचे फलक झळकत आहे. परिणामी, कामानिमित्त येणाºया नागरिकांना काम न होता तसेच खाली हात परत जावे लागत असल्याने त्यांच्यात रोष व्यक्त होत आहे.मालेगाव तालुक्यातील तुलनेने सर्वात मोठी ग्रामपंचायत, सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून शिरपूर जैनची ओळख आहे. येथे टोलेजंग इमारतीत दुय्यम निबंधक श्रेणी-१ चे कार्यालय कार्यान्वित असून असंख्य गावे त्याच्याशी जोडलेली आहेत. याठिकाणी शेती, घर, भुखंडांचे खरेदी-विक्री व्यवहार चालण्यासोबतच मालमत्ता दस्ताची नोंदणी करणे, दस्ताच्या सूचीची प्रमाणिक नक्कल देणे, शोध उपलब्ध करणे, ‘नोटीस आॅफ इन्टिमेशन’ची फाईल तयार करून घेणे, जुना मूळ दस्त नोंदणी करून परत देणे, मुद्रांक शुल्क भरण्याच्या प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे, दस्ता नोंदणीसंदर्भात गृहभेटी देणे, विशेष कुलमुखत्यारपत्राचे अधिप्रमाणन करून देणे, मृत्यूपत्रकर्त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र नोंदणी करणे आदी स्वरूपातील कामे केली जातात. त्यासाठी संगणकांना पूर्ण गतीने ‘नेट कनेक्टीव्हिटी’ मिळणे आवश्यक आहे; मात्र नेमकी हीच समस्या गत काही दिवसांपासून जाणवत असून शिरपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज यामुळे ठप्प झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन