शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकांच्या मागण्यांसाठी आयुक्तांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 15:41 IST

वाशिम: राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटक व अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रतिनिधींची एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रशासकीय अधिकारी व महिला व बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांच्याशी चर्चा झाली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने महिला व बालविकास आयुक्त यांची मुंबई येथे भेट घेतली. अंगणवाडी सेविकांचे एप्रिल, मे महिन्याचे प्रलंबित मानधन १५ दिवसांत अदा करण्याचे आश्वासन आयुक्त मालो यांनी दिले.

  वाशिम: राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आयटक व अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रतिनिधींची एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रशासकीय अधिकारी व महिला व बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो यांच्याशी चर्चा झाली असून, या चर्चेदरम्यान प्रलंबित मागण्यासाठी सोडविण्यासाठी आयुक्तांनी सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. ही माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सविता इंगळे यांनी मंगळवारी दिली. अंगणवाडी कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने महिला व बालविकास आयुक्त यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी अंगणवाडी कर्मचाºयांच्या विविध १७ मागण्यांचे निवेदनही सादर केले. त्यावेळी अंगणवाडी सेविकांचे एप्रिल, मे महिन्याचे प्रलंबित मानधन १५ दिवसांत अदा करण्याचे आश्वासन आयुक्त मालो यांनी दिले. त्याशिवाय ओटी भरण, उष्टावळ पंगत आदिंचे मार्चपर्यंतचे पैसे, टीएडीए याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली, तसेच सेवासमाप्ती लाभाची रक्कम १० दिवसांत देतानाच सेवानिवृत्तीची १ लाख ७५ हजारांची मर्यादा काढून एक वर्षाच्या सेवेसाठी एक महिन्याचे वेतन देण्याच्या अंगणवाडी कर्मचाºयांच्या मागणीही शासनाकडे मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या या भूमिकेमुळेच आयुक्त कार्यालयासमोर नियोजित आंदोलन आॅगस्टपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचाºयांच्या संघटनेने घेतला असून, पोषण आहाराच्या रकमेत केंद्राच्या वाढीनुसार वाढ करणे, रिक्त जागा तातडीने भरणे, पदोन्नतीवरील स्थगिती उठविण्याबाबतही शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची तयारी त्यांनी दर्शविल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष सविता इंगळे यांच्यासह, जिल्हा सचिव मालती राठोड, वाशिम तालुकाध्यक्ष किरण गिºहे, तालुका सचिव सरस्वती सुर्वे, कारंजा तालुकाध्यक्ष शेंद्रे, नवघन, सोनल ढोबळे आदिंची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम