शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

कार्यशाळेतून गाव विकासावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 18:07 IST

२१ सप्टेंबरपर्यंत १० पेक्षा अधिक ठिकाणी कार्यशाळा पार पडल्या.

लोकमत न्यूज नेटसर्कमानोरा (वाशिम) : आगामी पाच वर्षासाठी ग्राम पंचायतीचा विकास आराखडा तयार करण्यासाठी पंचायत समिती गणनिहाय एक दिवशीय कार्यशाळेला २० सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून, २१ सप्टेंबरपर्यंत १० पेक्षा अधिक ठिकाणी कार्यशाळा पार पडल्या. यावेळी गाव विकासावर चर्चा झाली.आमचं गाव आमचा विकास या उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्राम पंचायतींना सक्षम करण्यासाठी आगामी पाच वर्षाकरिता आराखडा तयार होत आहे. त्यासाठी मानोरा तालुक्यातील पंचायत समितीच्या गणानुसार समाविष्ठ गावांना एका ठिकाणी बैठक घेवुन सकाळी दिवशीय कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन होत आहे. इंझोरी येथे २० सप्टेंबर रोजी गोमेश्वर संस्थान येथे विस्तार अधिकारी नायसे, दिपा शरद कांबळे यांनी मार्गदर्शन केले. इंझोरी, जामदरा, म्हसणी,  तोरणाळा, दापुरा खु, अजनी येथे सरपंच, सचिव उपस्थित होते. कुपटा येथे २० सप्टेंबर रोजी महादेव मंदिर सभागृहात कुपटा, एकलारा, पारवा, वापटा, चोंढी, येथील सरपंच, सचिवांना मार्गदर्शन करण्यात आले. २० सप्टेंबर रोजी तळप येथे कारखेडा, तळप. बु. कार्ली, बोरव्हा, येथे मार्गदर्शन केले.  कारखेडा येथील शंकरगीरी महाराज सभागृहात  कार्यशाळा पार पडली. गिरोली पंचायत समिती गणात विस्तार अधिकारी संजय भगत, निर्मला रामदास केराम यांनी यांनी गिरोली, भिलडोंगर, गिर्डा, खापरी, येथील सरपंच, सविव, बचत गटातील महिलांना मार्गदर्शन केले. उद्घाटक  म्हणुन गिरोलीच्या सरपंच आरती खुशाल तवर होत्या.  २१ सप्टेंबर रोजी इंझोरी गणातील दापुरा बु. येथे महादेव मंदिर सभागृहात दापुरा बु. चौसाळा, रद्राळा, मोरगव्हाण, भोयणी, जनुना खुर्द भोयणी, जनुना खुर्द येथील सरपंच सचिवांना प्रशिक्षण देण्यात आले. कुपटा पंचायत समिती गणात विसतार अधिकारी एस.बी. चव्हाण, सुशिला दादाराव ठाकरे यांनी धामणी, आमगव्हाण, कोंडोली, आसोला बु.हिवरा बु. देवठाणा, गावातील सरपंच, सचिव यांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत आगामी पाच वर्षाच्या आराखडासंदर्भात नियोजन करण्यात आले. कार्यशाळेला सर्वच गावाचे पदाधिकारी ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.२३ सप्टेंबर रोजी फुलउमरी, पोहरादेवी, पाळोदी, २४ सप्टेंबर रोजी आसोला खुर्द, सावळी, वरोली व शेंदुरजना येथे त्या त्या पंचायत समिती गणानुसार कार्यशाळा होणार आहेत, असे गटविकास अधिकारी सुरज गोहाड यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा