शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंप जोडणीसंदर्भात महावितरणच्या अभियंत्यांशी चर्चा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 16:06 IST

वाशिम - थकित देयकापोटी कृषीपंपाचा वीजपुरवठा थेट खंडित केला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले. याप्रकरणी आमदार अमित झनक यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांशी मंगळवारी चर्चा करीत यावर तोडगा काढण्याची मागणी केली.

ठळक मुद्देआमदार झनक यांचा पुढाकार पुरवठा खंडित न करण्याची मागणी

वाशिम - थकित देयकापोटी कृषीपंपाचा वीजपुरवठा थेट खंडित केला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले. याप्रकरणी आमदार अमित झनक यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांशी मंगळवारी चर्चा करीत यावर तोडगा काढण्याची मागणी केली.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस समाधानकारक झाला नाही. मृग नक्षत्रात पाऊस गायब झाल्याने काही शेतकºयांना दुबार पेरणी तर काही शेतकºयांना विलंबाने पेरणी करावी लागली. त्यानंतरही पावसात सातत्य नव्हते. सोयाबीनला शेंगा धरण्याच्या कालावधीत पाऊस गायब झाला. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट आली. खरिप हंगामातील उणीव भरून काढण्यासाठी आता रब्बी हंगामावर शेतकºयांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, थकित बिलापोटी आता शेतकºयांना महावितरणचा ‘शॉक’ बसत आहे. आर्थिक अडचणींमुळे थकित देयकाचा भरणा तातडीने आताच करणे शक्य नसल्याचे काही शेतकºयांचे म्हणणे आहे. यासंदर्भात जऊळका रेल्वे, बेलखेडा किन्हीराजा, खेर्डा परिसरातील अनेक शेतकºयांनी आमदार अमित झनक यांच्याकडे समस्या मांडली. याची दखल घेत झनक यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांचे कार्यालय गाठून अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया यांच्यासमोर शेतकºयांच्या व्यथा मांडल्या. याप्रकरणी तोडगा काढण्याची मागणी केली. थकित शेतकºयांनी १५०० ते २००० रुपयांदरम्यान देयकाचा भरणा केला आणि उर्वरीत रक्कम टप्प्याटप्प्याने अदा केली तर कृषीपंप पुरवठा खंडित करू नये, असे ठरविण्यात आले. शेतकºयांच्या व्यथा जाणून सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी झनक यांनी केली. सुरूवातीला १५०० ते दोन हजार रुपयादरम्यान देयकाचा केल्यानंतर कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याची ग्वाही महावितरणच्या अभियंत्यांनी दिली. यावेळी कार्यकारी अभियंता तायडे, पं.स. सभापती गजानन भोने, बबन पाटील गारडे, काँग्रेस मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष बाजड यांच्यासह १०० ते १५०  शेतकºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :Power Shutdownभारनियमन