शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ परिषदेत शेतकर्‍यांच्या अडीअडचणींवर झाली चर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 01:55 IST

शेलूबाजार: ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, एक होऊ फक्त बापासाठी’, हे ब्रीदवाक्य घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील युवा शेतकर्‍यांनी एकत्र येत ११ फेब्रुवारीला ‘दुष्काळ परिषद’ घेतली. यात शेतकर्‍यांना जाणवणार्‍या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यासह शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध परिषदेत सहभागी मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून चांगलीच आगपाखड केली.

ठळक मुद्देयुवा शेतकर्‍यांचा पुढाकार शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध सहभागी मान्यवरांची आगपाखड

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार: ‘ना जातीसाठी ना धर्मासाठी, एक होऊ फक्त बापासाठी’, हे ब्रीदवाक्य घेऊन मंगरूळपीर तालुक्यातील युवा शेतकर्‍यांनी एकत्र येत ११ फेब्रुवारीला ‘दुष्काळ परिषद’ घेतली. यात शेतकर्‍यांना जाणवणार्‍या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यासह शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध परिषदेत सहभागी मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून चांगलीच आगपाखड केली.शेलूबाजार येथील लक्ष्मीचंद हायस्कुलमध्ये आयोजित या दुष्काळ परिषदेस प्रमुख वक्ते म्हणून वीज प्रश्न व शेतकरी कर्ज प्रकरणाचे अभ्यासक ललीतकुमार बहाडे, शेतीप्रश्नाचे अभ्यासक प्रा. उल्हास जाधव तथा शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती. ‘दुष्काळाची परिभाषा आणि उपाययोजना’, या विषयाला बहाडे यांनी हात घातला. ‘ग्रामीण समस्या व शहरी नागरिकांची भूमिका’, या विषयावर प्रा. उल्हास जाधव यांनी, तर ‘भावी आंदोलनात युवकांची भूमिका’ या विषयावर शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांनी मार्गदर्शन केले. सन १९६0-१९७0 च्या शतकात धान्याला मोताज असलेला भारत देश सध्या मात्र धन-धान्याने समृद्ध झालेला आहे. हा चमत्कार घडवून आणणार्‍या शेतकर्‍यांच्या वाट्याला मात्र केवळ कर्जबाजारीपणा आला आहे. शेतात काबाडकष्ट करून शेतीमाल उत्पादनवाढीचा फायदा शेतकरी सोडून इतर सर्व घटकांना झाला. याचा परिणाम देशात होणार्‍या लाखो शेतकरी आत्महत्येच्या स्वरूपात समोर आला आहे, असे सांगून शेतकर्‍यांचा विचार कोण करेल, असा प्रश्न अमदाबादकर यांनी यावेळी उपस्थित केला. दुष्काळ परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी शेलुबाजार, हिरंगी-खेर्डा, चोरद-जनुना, वनोजा, माळशेलू, नांदखेडा, धोत्रा (गणेशपूर), तर्‍हाळा, ईचा-नागी, शेंदूरजना मोरे, चिखली, पिंप्री खु., पिंप्री अवगण, अरक-चिंचाळा, कंझरा, पिंपळखुटा संगम, मसोला ब., भुर-पूर-रुई-तांदळी, गोगरी, पेडगाव, येडशी, पार्डी ताड, लाठी, तपोवन, मानोली आदी गावांमधील युवा शेतकर्‍यांनी पुढाकार घेतला. शेतकरी प्रतिनिधी म्हणून दामोदर इंगोले, चेतन महल्ले, श्रीकांत ठाकरे, रवी ठाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व परिषदेमागील भूमिका निमंत्रक अर्जुन भीमराव सुर्वे यांनी मांडली. कार्यक्रमाचे संचलन वैभव भिवरकर तथा आभार प्रदर्शन मधुकर ढोके यांनी केले. 

टॅग्स :washimवाशिम