शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा-अकोला पॅसेंजर गाडीत घाण, दुर्गंधी; प्रवाशांचे आरोग्य धोक्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 17:08 IST

वाशिम : येथील रेल्वे स्थानकावरुन अकोला - पूर्णा, अकोला , परळी या रेल्वे मार्गावर धावणाºया पॅसेंजर रेल्वे गाडीत घाण व दुर्गंधी  पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : येथील रेल्वे स्थानकावरुन अकोला - पूर्णा, अकोला , परळी या रेल्वे मार्गावर धावणाºया पॅसेंजर रेल्वे गाडीत घाण व दुर्गंधी  पसरली आहे. त्यामुळे या रेल्वेने प्रवास करणाºया हजारो रेल्वे प्रवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. तथापि, रेल्वे प्रशासन गाड्यांच्या साफसफाईबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. अकोला पूर्णा, व अकोला परळी, या लोह मार्गादरम्यान अकोला पूर्णा व अकोला परळी अशा चार फेºया दररोज धावत आहेत. या मार्गावरुन धावणाºया सदर रेल्वे गाडीची स्वच्छता होत नसून, यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण, कचरा, साचत आहेत. तसेच रेल्वेच्या डब्यात प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या टॉयलेट, बाथरुममध्येही पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत आहे. घाण कचºयामुळे प्रवाांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. एकिकडे पंतप्रधान देशात स्वच्छतेचे उपक्रम राबवित असतांना रेल्वे प्रशासन मात्र याकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत लक्ष देण्याची गरज असून, दक्षिण मध्य रेल्वे विभागाला रेल्वे प्रवाशाला चांगल्या सुविधा व स्वच्छता युक्त रेल्वे डब्बे, रेल्वे गाडीला जोडून या सुविधा देणे आवश्यक आहे. घाण व दुर्गंधी दूर करून प्रवाशांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.

 पॅसेंजर रेल्वे गाडीच्या डब्यांमध्ये घाण कचरा, तसेच दुर्गंधी आहे. हे खरे असले तरी वेळोवेळी रेल्वे डब्यांची नियमित स्वच्छता करण्यात येते.  रेल्वे प्रवाशांनीही स्वच्छतेच्या उपक्रमाला सहकार्य करुन रेल्वे स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.-राजेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी, दक्षिण-मध्य रेल्वे, नांदेड विभाग

टॅग्स :washimवाशिमrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी