शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चार पदांसाठी थेट लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 16:24 IST

Akola District Central cooperative Bank जिल्ह्यातील चार पदांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होत असून, थेट लढतीमुळे सहकार क्षेत्र ढवळून निघत आहे.

वाशिम : दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुकानिहाय सेवा सहकारी संस्थांच्या मतदारसंघात जिल्ह्यातील चार पदांसाठी २० फेब्रुवारी रोजी मतदान होत असून, थेट लढतीमुळे सहकार क्षेत्र ढवळून निघत आहे.दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा विहित कालावधी संपुष्टात आल्याने निवडणूक होत आहे. मालेगाव, वाशिम, कारंजा व मानोरा या चार तालुकानिहाय सेवा सहकारी संस्थांच्या मतदारसंघात चारही विद्यमान संचालकांसमोर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी तगडे आव्हान उभे केल्याने सहकार क्षेत्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. मालेगावमधून विद्यमान संचालक दिलीपराव जाधव यांची थेट लढत बाजार समितीचे संचालक प्रकाश पाटील कुटे यांच्याशी होत आहे. वाशिम येथे विद्यमान संचालक माधवराव काकडे व बाजार समितीचे माजी सभापती भागवतराव कोल्हे यांच्यात लढत होत आहे. कारंजा येथे विद्यमान संचालक श्रीधर पाटील कानकिरड व विजय पाटील काळे यांच्यात थेट लढत होत आहे. मानोरा येथे विद्यमान संचालक उमेश ठाकरे, बाजार समिती संचालक तुषार पाटील इंगोले, बँकेचे माजी संचालक सुरेश पाटील गावंडे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. ग्रामपंचायतींची निवडणुक नुकतीच संपली असून, आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदांसाठी निवडणूक होत असल्याने राजकारण पुन्हा शिगेला पोहचत असल्याचे दिसून येते. सहकार क्षेत्रातील या निवडणुकीमुळे विद्यमान संचालकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी तगडे आव्हान उभे केल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमbankबँकElectionनिवडणूक