शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाच्या डिजिटल दाखल्याचा प्रयोग यशस्वी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:25 IST

Income Certificate तलाठी दत्तराव माळेकर यांनी एक सॅाप्टवेअर बनवून विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्नाचे दाखले ‘डिजिटल’  स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत.  

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : तहसीलमार्फत देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांना ऑनलाइनची जोड मिळाली आहे; मात्र तलाठी यांच्यामार्फत देण्यात येणारे दाखले हे हस्तलिखित देण्याची पद्धत आहे. केकतउमरा येथील तलाठी दत्तराव माळेकर यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत एक सॅाप्टवेअर बनवून विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्नाचे दाखले ‘डिजिटल’  स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत.  या डिजिटल दाखल्याचे वितरण तहसीलदार विजय साळवे यांच्या हस्ते केकतउमरा येथील विठाबाई पसारकर विद्यालयात करण्यात आले. यावेळी तहसीलदार साळवे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाचा दाखला अत्यावश्यक असतो. अनेकदा हा दाखला वेळेवर मिळत नाही. बाहेरगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांना या छोट्याशा कामासाठी गावाकडे परत यावे लागते. या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थी मोबाइलद्वारे तलाठी यांना उत्पन्नाचा दाखला मागण्यासाठी ‘रिक्वेस्ट’ पाठवू शकणार आहेत व तलाठी त्या विद्यार्थ्याला मोबाइलवर डिजिटल स्वाक्षरी असलेला उत्पन्नाचा दाखला पीडीएफ स्वरूपात पाठवू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व पैशाची बचत होणार असल्याचे तहसीलदार साळवे म्हणाले. केकतउमरा येथील तलाठी माळेकर यांचा उत्पन्नाच्या डिजिटल दाखल्याचा प्रयोग हा राज्यातील पहिला असल्याचा दावाही यावेळी साळवे यांनी केला. माळेकर यांनी  तयार केलेल्या सॉफ्टवेअरबद्दल माहिती दिली.  शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षा पसारकर व संस्थचे सहसचिव अविनाश पसारकर यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमdigitalडिजिटल