शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दोन्ही बाजुने एकाच वेळी खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 14:40 IST

बांधकामाच्या ठिकाणी माहितीदर्शक फलकाचा अभाव : मुरूमही टाकला नाही लोकमत न्यूज नेटवर्क पांडवउमरा ( वाशिम ) : वाशिम ते ...

बांधकामाच्या ठिकाणी माहितीदर्शक फलकाचा अभाव : मुरूमही टाकला नाहीलोकमत न्यूज नेटवर्कपांडवउमरा (वाशिम) : वाशिम ते शेलुबाजार दरम्यान रस्ता नुतनीकरणाचे काम सुरू आहे. एकाच वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे खोदकाम करण्यात येत असल्याने वाहनांना बाजू देताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुने खोदकाम केल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम ते शेलुबाजार दरम्यान रस्ता रूंदीकरण सुरू आहे. पांडवउमरा ते वाशिम यादरम्यान दोन्ही बाजूने खोदकाम केले आहे. तीन लाख रुपयापेक्षा अधिक बांधकाम होत असलेल्या ठिकाणी माहितीदर्शक फलक लावणे आवश्यक आहे. सदर काम कोणत्या योजनेंतर्गत सुरू आहे, एकूण निधी, काम पूर्ण होण्याचा कालावधी व कंत्राटदाराचे नाव या फलकावर नमूद असणे आवश्यक आहे. या ठिकाणी असा माहितीदर्शक फलक आढळून येत नाही. रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे याकरीता या मार्गावरून अवजड वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे. तथापि, अवजड वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते. रस्त्याच्या दोन्ही बाजुने खोदकाम करुन त्यामध्ये काही ठिकाणी मातीमिश्रीत मुरुमाचा वापर केला तर तांदळी शेवई ते वाशिम या दरम्यान काही ठिकाणी मुरूमच टाकण्यात आला नाही. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.   

खोदकाम केलेल्या ठिकाणी लवकरच मुरुम टाकुन दबाई केली जाईल. वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. - आर.डी.लुंगेउपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वाशिम वाशिम ते शेलुबाजार मार्गावर बºयाच ठिकाणी दोन्ही बाजुने खोदकाम करुन ठेवले. पण  खोदलेल्या ठिकाणी मुरुम टाकला नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.- बबन नरवाडे,सामाजिक कार्यकर्ते, पांडवउमरा

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग