शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्याच्या आधारे पिकविली टरबुजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 16:48 IST

आदर्श शेती: मंगरुळपीर तालुक्यातील प्रगतशील शेतक-याचा उपक्रम

वाशिम : गतवर्षी जिल्ह्यात अपुरा पाऊस पडल्यानंतरही शेततळ्याच्या आधारे टरबुजाचे भरघोस उत्पादन घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील शेतकरी डिगांबर गिरी यांनी केली आहे. डिगांबर गिरी यांच्याकडे वडिलोपार्जित असलेली २० एकराहून अधिक शेती आहे. या शेतीत विविध प्रयोग करून ते भरघोस उत्पादन घेतात. डाळिंब, पपई, काकडी आदि पिकांसह भाजीपाल्यावर त्यांचा अधिक भर आहे. गेल्या काही वर्षांपासून ते आपल्या शेतीत टरबुजाचे उत्पादनही घेत आहेत. दरम्यान, यंदाही त्यांनी आपल्या एकूण शेतजमिनीपैकी दोन एकर क्षेत्रावर मल्चिंग पद्धतीने टरबुजाची लागवड केली आहे.

मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ ७४ टक्के पाऊस पडला. त्यामुळे तालुक्यातील जलस्त्रोत आटले असून, भूजल पातळीतही मोठी घट झाली आहे. यामुळे अनेक फलोत्पादक शेतक-यांना फटकाही बसला; परंतु डिगांबर गिरी यांची कल्पकता यशस्वी ठरली. त्यांनी आपल्या शेतीत भव्य असे शेततळे खोदले असून, पावसाच्या पाण्यासह शेतातील विहिरीचे पाणी त्यांनी या शेततळ्यात सोडून ते पावसाळ्यातच भरून घेतले आता. याच शेततळ्यातील पाण्याचा प्रभावी वापर करून त्यांनी दोन एकरात टरबुजाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. तथापि, कमी दर असल्याने त्यांना अपेक्षीत उत्पन्न मिळू शकले नाही.