शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पेरणीची तयारी करताय, कर्जासाठी प्रस्ताव दिला का?

By दिनेश पठाडे | Updated: October 3, 2023 17:11 IST

रब्बी हंगामात १४ हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट

वाशिम : जिल्ह्यात खरीप हंगामात उडीद, मूग, अल्पावधीत येणारे सोयाबीन घेतलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. बी - बियाण्याची जमवाजमव केली जात आहे. पेरणीसाठी अनेक शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासते, अशावेळी बँकेकडे अर्ज करून पीककर्ज घेणे शक्य आहे. काही दिवसांत सर्वच ठिकाणी सोयाबीन काढणीस प्रारंभ होईल. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. शिवाय बाजार समितीत आवक वाढल्यानंतर भावदेखील कमी होतात. अशावेळी शेतकरी सोयाबीन न विकता ठेवून देतात. 

रब्बी हंगामासाठी उसनवारी करून किंवा उधारीने बी-बियाणे घेतात. काहीजण खासगी सावकाराकडून कर्ज घेतात. यामुळे अनेकांना आर्थिक भुर्दंड बसतो. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज घेण्याचा मार्ग हिताचा ठरतो. यंदाच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यानुसार जिल्ह्याला रब्बी हंगामात १५५ कोटी २१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, ज्याचा लाभ १३ हजार ९९० शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. खरीप हंगामातील पीककर्ज वाटपाचा कालावधी ३० सप्टेंबरला संपुष्टात आला आहे. 

१ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामाचे पीककर्ज वाटपास प्रारंभ झाला आहे. त्या-त्या बँकेला कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र कमी असते. त्यामुळे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्टदेखील कमी राहत असल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगामात विक्रमी कर्जवाटप झाले आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामातही सुरुवातीच्या कालावधीपासूनच पीककर्ज वाटप गतीने करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी बँकांना दिल्या आहेत.

गतवर्षी होते १२६ कोटींचे उद्दिष्टरब्बी हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्याला १० हजार शेतकऱ्यांना १२६ कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या वर्षात बऱ्यापैकी कर्जवाटप करण्यात आले. खरीप हंगामात काही कारणास्तव कर्ज घेता आले नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पीककर्ज घेतले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी