शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात २८ मे पासून अतिसार नियंत्रण पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:58 IST

वाशिम : भारत सरकारच्या निर्देशानुसार २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यामध्ये राबविला जाणार.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारत सरकारच्या निर्देशानुसार २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत अतिसार नियंत्रण पंधरवडा जिल्ह्यामध्ये राबविला जाणार असून, त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी समन्वयातून विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिल्या.आरोग्य विभाग आणि युनिसेफच्यावतीने स्थानिक नियोजन भवनात आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते.  यावेळी न्यूमोनिया, डायरिया या आजारापासून सावध राहण्यासाठी नेमके काय करावे याची माहिती देण्यात आली. तसेच आगामी अतिसार नियंत्रण पंधरवडा, पूर्वनियोजन, विविध उपक्रम आदींची माहितीदेखील यावेळी देण्यात आली. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्वाधिक बालमृत्यू हे न्युमोनिया व डायरिया या दोन आजारामुळे होतात. यावर प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा तसेच पाणी व स्वच्छता विभागाने मिळून एकात्मिक पद्धतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशा सूचना दीपक कुमार मीना यांनी दिल्या. २८ मे ते ९ जून २०१९ या कालावधीत जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे. याचे पूर्वनियोजन करणे, विविध विभागाने सक्रिय सहभाग घेणे तसेच पुढील दोन महिन्यामध्ये एक पथदर्शी कार्यक्रम तयार करून पुढील दोन वर्षामध्ये न्यूमोनिया व डायरिया या आजाराच्या निर्देशांकमध्ये सुधारणा करण्याचे निर्देशही मीना यांनी दिले आहेत. यावेळी शुन्य ते पाच या वयोगटातील मुलांच्या आरोग्यासाठी सर्वाधिक घातक असलेल्या न्युमोनिया (श्वसनदाह) आणि डायरिया (हगवण) या आजारांवर प्रतिबंध घालण्यासंदर्भात एकात्मिक पध्दतीने प्रयत्न केले जातील, असे  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के,  जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितिन मोहुर्ले, युनिसेफचे आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश गढरी, डॉ. वैभव महात्मे आदिंची यावेळी उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य