शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

९० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या २२ मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून ‘क्लीन चिट’!, धनंजय मुंडे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 01:03 IST

कधीकाळी आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे या नेतेमंडळीवर भाजपाच्याच नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

कारंजा लाड (वाशिम) : भाजपा सरकारच्या २२ मंत्र्यांनी तब्बल ९० हजार कोटींचा घोटाळा केला आहे. त्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांकडे सादर करूनही अद्याप कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट’ दिली, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. आरोपाबाबत माझ्याकडे सर्व पुरावे असून खुल्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी तयार राहावे, असे आव्हानही मुंडे यांनी दिले. कारंजा येथील सभेत ते बोलत होते.राष्टÑवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे कारंजा येथे २० आॅगस्ट रोजी आगमन झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख, सुभाषराव ठाकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशामधील गैरप्रकार अर्थात ‘व्यापम’ घोटाळ्यात दोषी असलेल्या एका कंपनीला महाराष्ट्रात पदभरतीचे कंत्राट दिल्याचा आरोप करीत या दोषी कंपनीकडून राज्यात पारदर्शक नोकरी भरती कशी होईल, असा प्रश्न मुंडे यांनी वाशिम येथे पत्रकार परिषदेत उपस्थित केला.कधीकाळी आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे या नेतेमंडळीवर भाजपाच्याच नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता या तिघांनी भाजपात प्रवेश घेताच आरोप थांबले. या नेत्यांनी खरोखरच भ्रष्टाचार केला असेल, तर त्यांचे पितळ भाजपा आता उघडे पाडणार का, असा सवालही त्यांनी केला. महाजनादेश यात्रेत लाखो विहिरी, शेततळे उभारण्यात आल्याचे सांगितले जाते; मात्र ते किती खरे आहे, असा सवाल त्यांनी केला.व्यापम घोटाळ्यातील कुठल्याही कंपनीस शासनाच्या मेगाभरतीचे कंत्राट देण्यात आलेले नाही. महाराष्ट्रातील मेगाभरती ही पूर्णत: आॅनलाइन आहे आणि त्यात अनियमितता करण्यास कुठलाही वाव नाही. पूर्वीच्या आॅफलाइन भरतीसंदर्भात काही आरोप विधिमंडळात करण्यात आले होते आणि त्यांना उत्तरही देण्यात आले होते. - माधव भंडारी, मुख्य प्रवक्ता, प्रदेश भाजप

९० हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या२२ मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून ‘क्लीन चिट’!, धनंजय मुंडे यांचा आरोप; ‘व्यापम’मधील कंपनीला दिले कंत्राटकारंजा लाड (वाशिम) : भाजपा सरकारच्या २२ मंत्र्यांनी तब्बल ९० हजार कोटींचा घोटाळा केला आहे. त्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांकडे सादर करूनही अद्याप कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी ‘क्लीन चिट’ दिली, असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. आरोपाबाबत माझ्याकडे सर्व पुरावे असून खुल्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी तयार राहावे, असे आव्हानही मुंडे यांनी दिले. कारंजा येथील सभेत ते बोलत होते.राष्टÑवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचे कारंजा येथे २० आॅगस्ट रोजी आगमन झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख, सुभाषराव ठाकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशामधील गैरप्रकार अर्थात ‘व्यापम’ घोटाळ्यात दोषी असलेल्या एका कंपनीला महाराष्ट्रात पदभरतीचे कंत्राट दिल्याचा आरोप करीत या दोषी कंपनीकडून राज्यात पारदर्शक नोकरी भरती कशी होईल, असा प्रश्न मुंडे यांनी वाशिम येथे पत्रकार परिषदेत उपस्थित केला.कधीकाळी आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे या नेतेमंडळीवर भाजपाच्याच नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता या तिघांनी भाजपात प्रवेश घेताच आरोप थांबले. या नेत्यांनी खरोखरच भ्रष्टाचार केला असेल, तर त्यांचे पितळ भाजपा आता उघडे पाडणार का, असा सवालही त्यांनी केला. महाजनादेश यात्रेत लाखो विहिरी, शेततळे उभारण्यात आल्याचे सांगितले जाते; मात्र ते किती खरे आहे, असा सवाल त्यांनी केला.व्यापम घोटाळ्यातील कुठल्याही कंपनीस शासनाच्या मेगाभरतीचे कंत्राट देण्यात आलेले नाही. महाराष्ट्रातील मेगाभरती ही पूर्णत: आॅनलाइन आहे आणि त्यात अनियमितता करण्यास कुठलाही वाव नाही. पूर्वीच्या आॅफलाइन भरतीसंदर्भात काही आरोप विधिमंडळात करण्यात आले होते आणि त्यांना उत्तरही देण्यात आले होते. - माधव भंडारी, मुख्य प्रवक्ता, प्रदेश भाजप

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे