शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील ढाबे, हाॅटेल रात्री उशिरापर्यंत सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:20 IST

Washim News दरराेज रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या  हाॅटेल, ढाब्यांवर पार्ट्या हाेत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  जिल्ह्यातील १६७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा ज्वर सध्या ग्रामीण भागात चांगलाच चढला असून, ३ हजार २२६ उमेदवार सध्या प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र आहे. दरम्यान, प्रचारासाठी उमेदवारांकडे केवळ एकच दिवस उरला असला तरी दरराेज रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या  हाॅटेल, ढाब्यांवर पार्ट्या हाेत असल्याचे दिसून येत आहे.  अनेक ढाब्यांवर पाेलिसांकडून कारवाईही करण्यात आली. तरीसुद्धा छुप्या मार्गाने ढाबे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसून येत आहे. १३ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे उपलब्ध वेळेचा उमेदवार पुरेपूर वापर करून प्रचारावर भर देत आहेत. याकरिता कार्यकर्त्यांची माेठी फाैज उमेदवारांना साेबत लागत आहे. त्यांना खूश ठेवण्यासाठी दिवसभर प्रचार, भेटीगाठीनंतर ढाब्यांवर दारू, जेवणाळ्या उठताना दिसून येत आहे. वाशिम जिल्ह्यात १,४८७  उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. प्रत्यक्षात या १,४८७  जागांसाठी तीन हजार ३,२२६ उमेदवार निवडणूक रिंगणात भाग्य आजमावत आहेत. काही ठिकाणी माेठ्या प्रमाणात युवक रिंगणात उतरलेले दिसून येत आहे. दरम्यान, आठ दिवसांआधी जिल्हा पाेलीस अधीक्षकांनी रात्री उशिरा सुरू असलेल्या ढाब्यांवर कारवाई केली हाेती.  १३ जानेवारी राेजी प्रचार थांबणार असल्याने १२ जानेवारी व १३ जानेवारी राेजी कार्यकर्ते साेबत राहावेत यासाठी त्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे.

कार्यकर्त्यांची चंगळ जिल्ह्यातील निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. निवडणूक शांततेत पार पडावी याकरिता नागरिकांनीसुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणूक हाेत असलेल्या गावातील कार्यकर्त्यांची चांगलीच चंगळ हाेत आहे. ओल्या पार्ट्यांमध्ये कार्यकर्ते मग्न असून रात्री उशिरापर्यंत पार्ट्या हाेत असताना दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमhotelहॉटेलhighwayमहामार्ग