शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
2
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
3
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
4
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
5
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
6
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
7
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
8
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
9
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
10
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
11
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
12
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
13
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
14
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
15
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
16
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
17
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
18
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
19
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
20
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश

७४० भाविकांचे सामूहिक विजय ग्रंथ पारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 15:37 IST

सामूहिक पारायण सोहळयामध्ये ७४० भाविक सहभागी होऊन त्यांनी पारायण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  धार्मिक कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असलेले वाशिम शहरातील वाटाणे परिवाराच्यावतिने सामूहिक विजय ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या सामूहिक पारायण सोहळयामध्ये   ७४० भाविक सहभागी होऊन त्यांनी पारायण केले. विशेष म्हणजे यावेळी ज्यांच्याकडे  ग्रंथ नाहीत अशांना ग्रंथ सुध्दा उपलब्ध करुन देण्याचे कार्य वाटाणे परिवाराच्यावतिने करण्यात आले.१८ डिसेंबररपासून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाचा समारोप २० डिसेंबर रोजी महाप्रसादाने करण्यात आला. यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे या पारायण सोहळयामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. विशेषत बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी भोजनाची व्यवस्थाही वाटाणे परिवाराच्यावतिने करण्यासत आली होती. या तीन दिवसीय कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. आळंदी येथील प्रवीण महाराज काळे यांनी या पारायणाचे नेतृत्व केले. मागील तीन दिवस, सकाळी नऊ ते अकरा आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत पारायण झाले. दररोज सायंकाळी हरिपाठही झाला. मनोहर महाराज कोठेकर आणि शंकर महाराज इंगोले यांनी सुरेल गायन केले. तामसी येथील गजानन महाराजांनी मृदंगावर साथ केली. शुक्रवारी रात्री विजय महाराज गवळी यांचे कीर्तन झाले, तर २० डिसेंबर रोजी सकाळी सिताराम महाराज खानझोडे यांचे काल्याचे कीर्तन झाले. महाप्रसादाने पारायणाची सांगता झाली. उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.  कोठा येथील चिमुकले वारकरी ठरले लक्षवेधी! गुरुवारी रात्री झालेले विजय महाराज गवळी यांचे कीर्तन भाविकांसाठी पर्वणी ठरले. गायनाचार्य मनोहर महाराज यांनी तसेच मंगेश महाराजांनी त्यांना मृदंगावर साथ केली. विशेष म्हणजे कोठा येथील हरी बापू वारकरी शिक्षण संस्थेचे ५० विद्यार्थ्यांचे वारकरी मंडळही या कीर्तनाला उपस्थित होते. त्यांनी भाविकांचे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे तामसी नजीकच्या आश्रमातील श्याम बाबा, रतनगड येथील गोपाल महाराज, वडपचे चैतन्य बाबा, आसेगाव येथील आश्रमाचे योगीनाथ पुरी महाराज, येवता येथील शांती पुरी महाराज यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.  कार्यक्रमासाठी श्रीकृष्णराव वाटाणे, दिनकरराव वाटाणे, वसंतराव वाटाणे, मुख्याध्यापक वीरेंद्र वाटाणे, शिवाजीराव वाटाणे, नगर परिषद सभापती अतुल वाटाणे आदींनी पुढाकार घेतला. पंढरपूर येथे जाणाºया पालख्यांचे स्वागत करुन त्यांना अन्नदान करणाºया दिनकरराव वाटाणे यांनी गत काही वर्षांपासून सामूहिक ग्रंथ पारायण सोहळयाचे आयोजन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला १०१ भाविकांपासून सुरु झालेल्या या उपक्रमास आज शेकडो भाविक सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे ज्या भाविकांकडे ग्रंथ नाहीत अशांना मोफत ग्रंथ देऊन त्यामध्ये सहभागी करुन घेतल्या जाते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

टॅग्स :washimवाशिमspiritualअध्यात्मिक