शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामे अर्धवट; कंत्राटदारांना ग्रामपंचायतचे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 18:06 IST

पेव्हरब्लॉक रस्त्याचे काम करताना नाल्या बुजल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

लोकमत न्युज नेटवर्क भर जहॉगिर (वाशिम) : विविध योजनांतर्गत रिसोड तालुक्यातील भर जहॉगिर येथे सुरू करण्यात आलेली विकास कामे दोन वर्षांपासून अर्धवटच आहेत. त्यात स्मशानभूमीसह रस्ता कामाचा समावेश असून, पेव्हरब्लॉक रस्त्याचे काम करताना नाल्या बुजल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासन संबंधित कंत्राटदाराला  पाठीशी घालत असल्याचे येथे दिसून येत आहे.भर जहॉगिर ग्रामपंचायत अंतर्गत गेल्या दोन वर्षांपूर्वी काही विकासकामांना मंजुरी मिळाली आणि ती कामेही सुरू करण्यात आली. त्यात मुस्लिम बांधवांसाठी शादिखाना, पशूवैद्यकीय दवाखान्याची डागडुजी व इतर कामे, तसेच गावातील सिमेंट रस्त्यासह स्मशानभूमीसारख्या विविध विकासकामांचा समावेश होता. या कामांमुळे गावकºयांना सुविधाही उपलब्ध होणार होत्या. या कामांसाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाल्यानंतर ही कामे सुरू करण्यात आली; परंतु अर्धवट स्थितीतच ही कामे बंद करण्यात आली. आता दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी, यातील बहुतांश कामे अर्धवटच आहेत. त्यात शादिखान्याचे काम, पशू वैद्यकीय दवाखान्यातील फरशीचे काम, स्मशानभुमीच्या कुंपणाचे काम आणि रस्त्याच्या कामाचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही कामे अपूर्ण असतानाच कामांची देयकेही कंत्राटदारांना अदा करण्यात आली. आता ही कामे कोण पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच ग्रामपंचायत प्रशासन संबंधित कंत्राटदारांना कामे पूर्ण करण्याची सुचना देत नसल्याने ग्रामस्थांकडून शंका उपस्थित करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी नियमित ग्रामसेवक नसल्याने विकासकामांकडे लक्ष देणार कोण हा प्रश्नही उपस्थित होत आहे.

: ग्रामपंचायत अंतर्गत आपण रुजू होण्यापूर्वी सुरू झालेल्या विकासकामांबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. पूर्वीच्या ग्रामसेवकांकडे असलेले रेकॉड अद्याप प्राप्त झाले नाही. हे रेकॉर्ड प्राप्त झाल्यानंतरच  काही सांगता येईल.-नंदू भुसारीग्रामसचिव, भर जहॉगिर

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत