शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कुरळावासीयांची तहान भागविण्यासाठी अवतरला ‘देव’राव ; पाईपलाईन टाकून गावात आणले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 15:22 IST

देवराव भीमराव घुगे यांनी आपल्या शेतातील भरपूर पाणी उपलब्ध असलेल्या कुपनलिकेवरून स्वखर्चाने १२०० मीटरची पाईपलाईन टाकून गावकºयांना पाणी उपलब्ध करून दिले.

ठळक मुद्देकुरळा या गावात सार्वजनिक वापराच्या चार विहिरी आणि पाच हातपंप आहेत. मात्र, यापैकी कुठल्याच जलस्त्रोतास सद्या पाणी शिल्लक राहिलेले नाही. गावासाठी रमेशराव घुगे यांनी शेतातून पाईपलाईन टाकून गावात पाणी आणले आहे. 

 मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील १५०० लोकवस्तीच्या कुरळा या गावातील सर्वच जलस्त्रोत कोरडे पडल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण भटकंती होत आहे. ही स्थिती लक्षात घेवून गावातीलच देवराव भीमराव घुगे यांनी आपल्या शेतातील भरपूर पाणी उपलब्ध असलेल्या कुपनलिकेवरून स्वखर्चाने १२०० मीटरची पाईपलाईन टाकून गावकºयांना पाणी उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.कुरळा या गावात सार्वजनिक वापराच्या चार विहिरी आणि पाच हातपंप आहेत. मात्र, यापैकी कुठल्याच जलस्त्रोतास सद्या पाणी शिल्लक राहिलेले नाही. परिणामी, गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या विपरित परिस्थितीवर मात करण्यासाठी देवराव घुगे यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत स्वखर्चाने १२०० मीटर पाईपलाईन टाकत आपल्या शेतातील कुपनलिकेचे पाणी गावालगतच्या मंदाबाई घुगे यांच्या विहिरीत सोडले. यामाध्यमातून अर्धेअधिक गाव पाणीटंचाईमुक्त झाले असून उर्वरित गावासाठी रमेशराव घुगे यांनी शेतातून पाईपलाईन टाकून गावात पाणी आणले आहे. पिकांपेक्षा गावकºयांची तहान महत्वाची- देवराव घुगेमाझ्या शेतातील कुपनलिकेला मुबलक पाणी आहे. यामाध्यमातून मी विविध स्वरूपातील पिके घेवू शकतो; परंतु अशा पद्धतीने मिळणाºया पैशांपेक्षा माझ्या गावातील नागरिकांची तहान भागणे महत्वाचे आहे. त्यामुळेच मी सर्व पाणी गावकºयांसाठी उपलब्ध केल्याचे देवराव घुगे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवWaterपाणी