मानोरा (जि. वाशिम) : पोलीस कोठडीतून २४ एप्रिल २0१५ ला पलायन करणारा घरफोडी प्रकरणातील अट्टल गुन्हेगार सै. शहजाद सै. मुजफ्फर (२२)या आरोपिस ६ सप्टेंबर रोजी दारव्हा येथील न्यायालयातून ताब्यात घेऊन मानोरा न्यायालयात हजर केले असता ९ सप्टेंबरपर्यंंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. घरफोडी प्रकरणातील अट्टल गुन्हेगार मूळचा दारव्हा येथील आणि हल्ली मानोरा येथील सै. शहजाद सै. मुजफ्फर (२२) या आरोपीस २४ एप्रिल २0१५ ला मानोरा पोलिसांनी अटक करून कारागृहात टाकले होते. शौचालयास जाण्याच्या बहाण्याने तो अट्टल गुन्हेगार त्याच दिवशी रात्री ९.३0 वाजता तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. सदर आरोपीने १७ फेब्रुवारीला रात्री मानोरातील राहुल पार्क परिसरातील दिलीप सातपुते यांच्या घरातून सोन्या चांदीच्या दागिण्यांसह एकूण ४६ हजार, तसेच २३ मार्चच्या रात्री शिवाजी चौकतील ऑटोमोबाइल्स मधुन २१ हजार ३५0 रुपये आणि २८ मार्चच्या रात्री मानोरातीलच देवानंद राठोड यांच्या घरातून १0 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
घरफोड्या पोलीस कोठडीत
By admin | Updated: September 9, 2015 01:50 IST