शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

जलसाठा असतानाही शेती कोरडीच!

By admin | Updated: March 15, 2016 02:19 IST

मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांच्या आदेशाची अवहेलना.

देपूळ (जि. वाशिम): चार हजार एकर सिंचन क्षमता असणार्‍या वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पात पुरेसा जलसाठा असतानाही केवळ वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतजमीन कोरडीच राहत आहे.दुष्काळाचा सामना करणार्‍या वाशिम जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांसंबंधी विशेष लक्ष पुरवून १0 बॅरेजेससह वारा जहाँगीर सिंचन प्रकल्पाला विद्युत पुरवठा त्वरित करा, असे आदेश विद्युत वि तरण कंपनीला १५ डिसेंबर २0१५ च्या नागपूर येथील आढावा बैठकीमध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. असे असताना विद्युत वितरण कं पनीने या प्रकल्पावर विद्युत जोडणी देण्यास सुरुवात केलेली नाही. यामध्ये बहुतांश शेतकरी आ त्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तीही वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. जलसाठा असताना वीज पुरवठा नसल्याने यावर्षीचा हंगाम कोरडाच गेला. परंतु एप्रिल, मे महिन्यात वीज जोडणी न मिळाल्यास पुढील वर्षीचा खरीप व रब्बी हंगाम कोरडाच जाणार आहे. जर जलसाठा असताना जमीन कोरडीच राहून, या भागात शेतकरी आत्महत्या झाल्यास शासनाने १00 कोटी खर्च करुन तयार केलेल्या सिंचन प्रकल्पाचा काय उपयोग, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत. आमदार राजेंद्र पाटणी यांनी सिंचन प्रकल्पाला त्वरित विद्युत पुरवठा मिळावा म्हणून वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून आढावा घेतला. सदर व्यथा ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्याच्या कानावर टाकली. यावरुन ऊर्जामंत्र्यांनी वाशिमला येऊन या कामाचा आढावा घेतला व वीज जोडणीचे काम त्वरित करण्याचे आदेश ऊर्जामंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिले. परंतु वीज जोडणीच्या कामाला चक्क वीज वितरण कंपनीने केराची टोपली दाखविल्याचे निर्दशनास येत आहे.वीज जोडणीच्या कामावर प्रत्यक्ष आमदार पाटणी, ऊर्जामंत्री, मुख्यमंत्री लक्ष देऊन असताना मंगरुळपीर वीज उपविभागांतर्गत येणार्‍या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्राचे प्रभारी कनिष्ठ अभियंता खंडारे यांच्याकडे सिंचन प्रकल्पावर वीज जोडणी संदर्भातील १00 च्यावर अर्ज धूळ खात पडले आहेत. याउलट वाशिम उपविभागामार्फत याच प्रकल्पावरील वीज जोडणी अर्जाला मंजुरी देऊन नवीन ८ वीज रोहित्र मंजूर केले आहेत. परंतु मंगरुळपीर उपविभागामार्फत एकही नवीन रोहित्र मागणी असून, मंजूर झाले नाही, हे विशेष.