शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरात देऊनही सरकारी कोविड रुग्णालयांना तज्ज्ञ डॉक्टर्स् मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 11:27 IST

Government Covid hospitals did not get specialist doctors : खासगी डॉक्टरांनी शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देण्यासाठी पुढे यावे, अशी साद जिल्हा प्रशासनाने घातली आहे.

- संतोष वानखडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. दोन वेळा जाहिरात देऊनही तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होत नसल्याने शेवटी खासगी डॉक्टरांनी शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देण्यासाठी पुढे यावे, अशी साद जिल्हा प्रशासनाने घातली आहे.जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. सप्टेंबर २०२० पर्यंत झेपावलेला कोरोनाचा आलेख नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत प्रचंड खाली घसरला. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. कोरोनाबाधितांवर योग्य उपचार मिळावे याकरीता जिल्ह्यात आठ सरकारी कोविड केअर सेंटर व तीन सरकारी कोविड हॉस्पिटल आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये ८९० खाटांची व्यवस्था आहे. ६२६ खाटांना ऑक्सिजनची व्यवस्था, ५१ खाटांना एनआयव्ही व ३२ खाटांना बायपॅप मशीनची सुविधा आहे. कोरोना योद्धे म्हणून काम करणारे सरकारी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. गेल्या एक वर्षापासून अथकपणे कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या या योद्ध्यांवर सध्या अधिक ताण आहे. जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत. तसेच येत्या काही दिवसांत आणखी काही खाटांची संख्या वाढविण्याचे नियोजन आहे. यासाठी एम.डी. मेडिसिन, चेस्ट फिजिशियन, भूलतज्ज्ञ आदी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज भासणार असून ही पदे भरण्यासाठी दोन वेळा जाहिरातदेखील देण्यात आली. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध होऊ शकले नाहीत. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे सध्या दोन एम.डी. डॉक्टर आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची गरज असल्याने सध्याच्या कोरोना संसगार्मुळे निर्माण झालेल्या राष्ट्रीय आपत्तीमध्ये जिल्ह्यातील खासगी तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा शासकीय हॉस्पिटलमध्ये द्यावी, अशी साद जिल्हा प्रशासनाने घातली आहे. याला प्रतिसाद देत सध्या एक खासगी भूलतज्ज्ञ व सर्जन यांनी विनामूल्य सेवा देण्याला होकार दिला आहे. खाजगी तज्ज्ञ डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेसोबत येऊन जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करावे, अशी साद जिल्हा प्रशासनाने घातली आहे.

रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आणखी काही खाटांचे नियोजन आहे. कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आजच्या परिस्थितीत खासगी तज्ज्ञ डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेसोबत येऊन जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करावे. - शण्मुगराजन एस. जिल्हाधिकारी, वाशिम

जिल्हा कोविड रुग्णालयात सध्या दोन एम.डी. डॉक्टर उपलब्ध आहेत. जाहिरात देऊनही तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत. दोन खासगी डॉक्टर विनामूल्य सेवा देण्यासाठी समोर आले आहेत, ही बाब जिल्ह्यासाठी भूषणावह आहे.    

        - डॉ. मधुकर राठोड जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याwashimवाशिम