शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वंचित शेतकऱ्यांनाही मिळणार पीक नुकसानभरपाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 16:40 IST

वाशिम : राज्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार व महा’ चक्रिवादळ, अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे ...

ठळक मुद्देआॅक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये झाले होते नुकसानअमरावती विभागाला ७०.८ कोटी मिळाले.

वाशिम : राज्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार व महा’ चक्रिवादळ, अवेळी पावसामुळे राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानभरपाईपासून वंचित असलेल्या शेतकºयांसाठी महसूल विभागाने २९ जून रोजी राज्यातील चारही महसूल विभागासाठी ३२६ कोटी २२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, यामध्ये अमरावती विभागाला ७० कोटी ८ लाख २४ हजार रुपये मिळाले आहेत.राज्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये ‘क्यार व महा’ चक्रिवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अवकाळी पाऊस पडून राज्यातील ३४ जिल्ह्यातील ३४९ तालुक्यांतील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते.  नुकसानापोटी यापूर्वी तीन टप्प्यात शासनाकडून निधी मिळालेला आहे. परंतू, यामधूनही अनेक शेतकरी वंचित राहिल्याने राज्यातील पुणे, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या चारही महसूल विभागाने शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी नोंदविली होती. सहा महिन्यानंतरही निधी मिळत नसल्याचे पाहून नुकसानभरपाईपासून वंचित असलेले शेतकरी तहसिल स्तरावर चकरा मारीत होते. शेवटी २९ जून रोजी महसूल विभागाने नुकसानभरपाईपोटी चार महसूल विभागाकरीता ३२६ कोटी २२ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.  यामध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांना ७० कोटी ८ लाख २४ हजार रुपये मिळणार असून, यामध्ये वाशिम जिल्हा १३ कोटी ६७ लाख ८५ हजार, बुलडाणा दोन कोटी १४ लाख ६३ हजार, अकोला नऊ कोटी ८९ लाख २४ हजार, अमरावती ११ कोटी ८ लाख ८२ हजार, यवतमाळ जिल्ह्याकरीता ३३ कोटी २७ लाख ७० हजाराच्या निधीचा समावेश आहे. या निधीमधून लवकरच वंचित शेतकºयांना नुकसाभरपाईची रक्कम दिली जाणार आहे.

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्र