शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

केरळपूरग्रस्तांच्या मदतीसाठी वेतनातून रक्कम कपात करण्यास मानोरा तालुक्यातील शिक्षकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 16:48 IST

मानोरा (वाशिम) : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून एक दिवसाचे वेतन कपात करण्यास मानोरा तालुक्यातील नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेच्या शिक्षकांनी नकार दर्शविला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून एक दिवसाचे वेतन कपात करण्यास मानोरा तालुक्यातील नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेच्या शिक्षकांनी नकार दर्शविला आहे. एका दिवसाचे वेतन मदत निधीसाठी कपात करू नये, असे पत्र शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाºयांना शनिवारी दिले. आम्ही स्वत: केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक दिवसाच्या वेतनाची रक्कम जमा करू, असा निर्धार या शिक्षक संघटनेने केला.२००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाºयांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात आलेला नाही. त्याऐवजी नवीन अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) लादण्यात आली आहे. ही योजना रद्द करून जुनीच पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी गेल्या पाच वर्षांपासून रस्त्यावर उतरून संघर्ष करीत असल्याचे नमूद करीत या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप  नवीन अंशदायी पेन्शन कर्मचारी संघटनेच्या शिक्षकांनी केला. ‘डीसीपीएस’मुळे कर्मचाºयांचे व त्यांच्या कुटुंबियांचे भवितव्य अंधकारमय होत आहे, असे या शिक्षकांनी निवेदनात नमूद केले.  २००५ नंतर राज्य शासनाच्या सेवेत नोकरी करणाºया जवळपास तीन हजार कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. मात्र जुनी पेन्शन योजना लागू नसल्याने या कर्मचाºयांच्या कुटुंबियांपुढे आज जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे राज्य शासन सहानुभूतीने पाहावयास तयार नाही, असा आरोप करीत या मागणीचाही शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी शिक्षकांनी केली. जुनी पेन्शन योजना लागू न केल्यामुळे राज्य शासनाकडे मदत निधी न देता थेट केरळच्या मुख्यमंत्री सहायता निधीत रक्कम जमा करणार असल्याचे शिक्षकांनी निवेदनात नमूद केले. निवेदन देतेवेळी बालाजी मोटे, गोपाल लोखंडे, निलेश कानडे, हरिदास मते, रवि ठाकरे, बालाजी फताटे, गोविंद पोतदार, निलेश मोरे, अर्जून लोंढे, धीरज आडे, प्रमोद पवार , संदिप सावळे, चंद्रमणी इंगोले, सचिन सवडतकर, गणेश गवई, अमोल ठोंबरे, मिलींद दुथडे, दत्ता ओवांडकर, जयप्रकाश गायकवाड, समीर देशमुख यांच्यासह शिक्षकांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोराKerala Floodsकेरळ पूर