शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इंझोरीत डेंग्युसदृश आजाराची साथ; विषमज्वर, हिवताप, अतिसाराचाही प्रादूर्भाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 16:10 IST

इंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे डेंग्युसदृश आजाराची साथ पसरली आहे.  जवळपास १o ते १२ जणांना डेंग्यूसदृश लक्षणे दिसत असून, त्यातील सहा जणांवर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार करावे लागलेे.

लोकमत न्यूज नेटवर्क इंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे डेंग्युसदृश आजाराची साथ पसरली आहे.  जवळपास १o ते १२ जणांना डेंग्यूसदृश लक्षणे दिसत असून, त्यातील सहा जणांवर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार करावे लागलेे. त्याशिवाय हिवतांप, अतिसार आणि सर्दी खोकल्याच्या आजारांचाही येथे प्रादूर्भाव आहे.  यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील महिनाभरापासून इंझोरी येथे साथरोगांचा प्रादूर्भाव झाला असताना आरोग्य विभागाकडून अद्यापही या ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रभावी उपाययोजना राबविण्यात आली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या संदर्भात वारंवार आरोग्य विभागाला माहिती देऊन उपचार सुविधा उपलब्ध करण्यासह तपासणी शिबिर राबविण्याची मागणीही केली. तथापि, त्याची दखल घेण्यात आली नाही. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने गावकरी चांगलेच धास्तावले आहेत.  इंझोरी परिसरात दिवसभर रखरखते उन्ह आणि रात्री वातावरणात मोठा गारवा निर्माण होत आहे. या विषम वातावरणामुळेच गावात साथरोगांनी तोंड वर काढले आहे. बहुतांश घरात कुठल्या न कुठल्या आजाराची लागण झालेली व्यक्ती आढळते. सर्दी, ताप, खोकला, अतिसार, मलेरिया, विषमज्वर या आजारांसह डेंग्युसदृश आजारांनी तोंड वर काढले आहे. प्रामुख्याने लहान मुलांना या आजाराची लागण झाली आहे. त्यातच  डेंग्युसदृश आजाराची लागण सहा जाणांना झाली आहे. स्थानिक व तालुकास्तरावरील शासकीय रुग्णालयात उपचार करुनही आजार बरा होत नसल्याने या रुग्णांनी अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली आहे.

टॅग्स :washimवाशिमdengueडेंग्यू