मानोरा (वाशिम) : पोहरादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्या भुली येथील अभय गोपाल राठोड (१२) व अक्षय गोपाल राठोड (१0) या सख्ख्या भावंडांना डेंग्यूची लागण झाल्याने त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत.भुली येथील अभय गोपाल राठोड व अक्षय गोपाल राठोड यास ताप येत असल्याने दिग्रस ये थील खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने यवतमाळ येथील बालरोगतज्ज्ञ वीरेंद्र राठोड यांच्या रूग्णालयात भरती करण्यात आले. फक्त तपासणीनंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे पुढे आले आहे. भुली येथे मोठय़ा प्रमाणात ताप, खोकला, पोटदुखीचे रुग्ण आहेत.
भुली येथे डेंग्यूची लागण
By admin | Updated: October 15, 2014 00:58 IST