शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर पालिकेच्या व्यापारी संकुलाचा पुन्हा लिलाव करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 15:52 IST

संकुलातील ४५ गाळे रिकामे करून पुन्हा त्याचा लिलाव करावा अशी मागणी माजी नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे संकुलातील काही गाळेधारकांनी लाखो रुपये घेऊन इतर लोकांना परस्पर दुकाने विकली आहेत.पालिकेने ठराव क्रमांक तीन द्वारे ३० आॅगस्ट २००४ पर्यंत गाळे धारकांना मुदतवाढ दिली होती.या नियमबाह्य कृतीचे विरुद्ध १ मे पासून नगर पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शर्मा यांनी दिला.

मंगरुळपीर -  मंगरूळपीर नगर पालिकेने काही वर्षांपूर्वी व्यापारी संकुलातील ४५ दुकाने तीस वर्षासाठी भाड्याने दिले होते. परंतु त्यास आजपर्यंत वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. या संकुलातील ४५ गाळे रिकामे करून पुन्हा त्याचा लिलाव करावा अशी मागणी माजी नगरसेवक ओमप्रकाश शर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे.

 निवेदनात नमूद आहे की, या संकुलातील काही गाळेधारकांनी लाखो रुपये घेऊन इतर लोकांना परस्पर दुकाने विकली आहेत. तसेच काहींनी पोट भाडेकरू ठेऊन हजारो रुपये घेतले आहेत. पालिकेने ठराव क्रमांक तीन द्वारे ३० आॅगस्ट २००४ पर्यंत गाळे धारकांना मुदतवाढ दिली होती. याला सुद्धा पंधरा वर्षांचा कार्यकाळ झाला आहे. हा प्रकार विद्यमान पालिका मुख्याधिकाºयांना कळविण्यात आला होता. याची दखल घेऊन मुख्याधिकाºयांनी गाळेधारकांना गाळे रिकामे करण्याचे आदेशसुद्धा दिले आहेत. परंतु काही जण गाळे धारकांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा कट रचत आहेत, असे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे हे गाळे भाड्याने देऊन तीस वर्षाचा कालावधी झाल्याने स्थायी निर्देश २४चे उल्लंघन झाले असून या नियमबाह्य कृतीचे विरुद्ध १ मे पासून नगर पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शर्मा यांनी दिला.

 

मंगरूळपीर पालिकेचे शर्मा यांना पत्र

यासंदर्भात पालिका मुख्याधिकाऱ्यांनी २३ एप्रिल रोजी शर्मा यांना पत्र दिले असून पालिकेने ३ जून २०१७ रोजी ठराव क्रमांक २५ नुसार सर्वसाधारण सभेने भाडे निश्चित करण्यासाठी मंजुरी प्रदान केली असून भाडे निश्चित करण्यासाठी २६ आॅक्टोबर २०१७ रोजी सहायक संचालक नगर रचना यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु यामध्ये त्रुटी असून याची पूर्तता झाल्यावर तसेच सहायक संचालक यांनी केलेली भाडेनिश्चिती व जिल्हाधिकारी यांचे त्रिसदस्यी समितीच्या अहवालानुसार सदरची कारवाई करण्यात येणार असल्याचे या पत्रात नमूद आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर