मागील एका महिन्यापेक्षा अधिक कालावधीपासून कोरोना संसर्ग आजाराचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जीवनावश्यक व इतर काही आस्थापना सुरू परवानगी देण्यात आली आहे. कापड दुकाने तथा रेनकोट, छत्री, प्लास्टिक, ताडपत्री विक्री दुकाने पूर्णत: बंद ठेवण्यात आली. आता पावसाळ्याचे दिवस जवळ आल्याने पेरणीचा हंगामसुद्धा जवळ आला आहे. शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खते ट्रॅक्टर अथवा बैलगाडीतून शेतामध्ये न्यावी लागणार आहेत. पावसामुळे खत, बियाणे ओले होऊ नयेत यासाठी शेतकऱ्यांना प्लास्टिक व ताडपत्रीची प्रचंड आवश्यकता भासते. मात्र महिन्याभरापेक्षा अधिक कालावधीपासून प्लास्टिक ताडपत्री, छत्री, रेनकोट विक्रीची दुकाने पूर्णतः बंद आहेत. पावसाळा व खरीप हंगामाची पेरणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या प्लास्टिक ताडपत्रीसह रेनकोट, छत्री विक्रीची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने दिलीप एकनाथ जाधव या युवा शेतकऱ्याने केली आहे.
प्लास्टिक, ताडपत्री विक्री करण्यास मुभा देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST