शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील गारपिटग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 13:34 IST

वाशिम - महसूल व कृषी विभागाने पंचनामे करताना दिरंगाई करू नये तसेच शासनाने गारपिटग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षातर्फे १२ व १३ फेब्रुवारीला जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

ठळक मुद्देरविवारी वाशिम जिल्हयात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात गारपिट झाली. पृष्ठभूमीवर शासनाने नुकसानग्रस्तांना भरघोष मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. 

वाशिम - वाशिम जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये २२ ते २५ हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर महसूल व कृषी विभागाने पंचनामे करताना दिरंगाई करू नये तसेच शासनाने गारपिटग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षातर्फे १२ व १३ फेब्रुवारीला जिल्हाधिकाºयांमार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

रविवारी वाशिम जिल्हयात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात गारपिट झाली. सोमवारी सायंकाळी कारंजा तालुक्यात गारपिट व अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील काही भागातील पिकांचे नुकसान झाले आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने नुकसानग्रस्तांना भरघोष मदत द्यावी, अशी मागणी विविध संघटना व पक्षाच्या पदाधिकाºयांनी केली. 

पिकाच्या नुकसान भरपाई व जिवित हानीबद्दल पिडीतांना शासनाने प्रत्येकी दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी छावा संघटनेने केली. गारपीटीमुळे कापूस, आंबा, हरभरा, भाजीपाला, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले उत्पन्न पाहता पाहता निघून गेले.  नैसर्गीक आपत्तीमध्ये सापडलेले शेतकरी व जिवित हाणीग्रस्त कुटुंबांना तातडीने अर्थसहाय्यची कार्यवाही होण्यास प्रशासकीय कार्यवाहीमध्ये वेळ होत असल्यास तात्काळ सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात यावे. सानुग्रह अनुदानाची रक्कम रुपये १० लाखापेक्षा कमी नसावी अशी मागणी संघटनेने केली. यावेळी छावा संघटनेचे विदर्भ संपर्कप्रमुख मनिष डांगे, विदर्भ संघटक गणेश गांजरे, जिल्हा संपर्कप्रमुख गजानन काळपांडे, जिल्हा निरिक्षक दिपक पानझाडे, जिल्हा प्रवक्ता संजय ढवळे, महिला जिल्हाध्यक्ष बेबी पडघान यांच्यासह अ.भा. छावा संघटना, सिंहगर्जना युवक अपंग विकास सामाजिक संघटना, छावा गणेशोत्सव मंडळ, छावा नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पार्डी तिखे परिसरातील हरभरा व गहू, संत्रा आदींचे अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे.  सरपंच शेषराव दगडूजी अंभोरे, पोलीस पाटील श्रीकांत तिखे यांनी  शेतावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत देण्याची मागणी सरपंच शेषराव  अंभोरे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे जिल्हाधिकाºयांमार्फत १२ फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे केली. शारदा खोडके, नारायण अमृता तिखे, गणेश फलटणकर, रामेश्वर पुंजाजी वडकर, गणेश वडकर, प्रकाश धूड, विश्वनाथ लोडजी पोफळे, गीताबाई वडकर, प्रभाकर तिखे यांच्यासह ३० ते ४० शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले असून, शासनाने भरघोष मदत द्यावी, अशी मागणी सरपंच, पोलीस पाटलांसह शेतकºयांनी केली.

वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा म्हणून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी बुधवारी केली.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय