निवेदनात असे नमूद आहे की, जुने शहरातील नासरजंग चौक परिसरात अनेक वर्षांपूर्वी नगरपालिकेची शाळा होती, परंतु ही इमारत खूप जुनी असल्याने ती जीर्ण होऊन पडली. या इमारतीचे साहित्य नागरिकांनी लंपास केल्याने सध्या या ठिकाणी केवळ खुली जागा आहे. त्या जागेवर कचरा व घाणीचे साम्राज्य असून यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिकेच्या या शाळेच्या जागेवर सौंदर्यीकरण करण्यात यावे, तसेच या ठिकाणी पाण्याची टाकी, ग्रंथालय उभारून हज यात्रेकरूंसाठी प्रशिक्षण केंद्र उभारावे, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर संघटनेचे तालुका अध्यक्ष इंजरगुल पठाण, शहर अध्यक्ष जुबेर अहेमद, अ. कलाम, जमीर शाहेद अली, अफजल खान, गणेश राठी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चौकाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:50 IST