शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘टेस्टिंग रिपोर्ट’अभावी शेतकऱ्यांना कृषी रोहित्र मिळण्यास विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 14:40 IST

‘टेस्टिंग रिपोर्ट’ लवकर मिळत नसल्याने विज जोडणी मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतीला सिंचनासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी रोहित्रांची मागणी केली आहे; मात्र लाखो रुपये भरुनही केवळ ‘टेस्टिंग रिपोर्ट’ लवकर मिळत नसल्याने विज जोडणी मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. सद्या सुरु असलेल्या रब्बीतील पिकांवर त्याचा परिणाम होत आहे.जिल्ह्यात ४ हजार ४४५ कृषीपंपांना विजजोडणी देण्याचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी १५ फेब्रूवारी २०२० अखेर २ हजार २४१ कृषीपंपांना विजजोडणी देण्यात आली असून २ हजार १४१ कृषीपंपांना विजजोडणीचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधून सिंचनासाठी पाणी घेऊ इच्छित काही शेतकºयांना विजेची गरज भासत आहे. त्यासाठी त्यांनी रितसर अर्ज करून तथा आवश्यक असलेली लाखो रुपयांची रक्कम अदा करूनही केवळ ‘टेस्टिंग रिपोर्ट’ मिळण्यास विलंब होत असल्याने रोहित्र कार्यान्वित होणे अशक्य झाले आहे. यासंदर्भात माहिती जाणून घेतली असता, ठेकेदारांकडून रोहित्र बसविल्यानंतर त्याची विद्यूत निरीक्षकांकडून तपासणी केली जाते. त्यात रोहित्र किती क्षमतेचे आहे, त्याच क्षमतेचे फेज लावण्यात आले आहे का, प्रत्येक विद्यूत खांबावर नियमानुसार आर्थिंग तार बसविली आहे का, आदींचा समावेश आहे. या निरीक्षणानंतरच रोहित्रांचा ‘टेस्टिंग रिपोर्ट’ देऊन रोहित्रांना विद्यूत जोडणीस परवानगी दिली जाते. हा रिपोर्ट मिळण्यास मात्र बराच विलंब लागत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.महिनाभरापूर्वी २.६० लाख रुपये भरूनही मिळाले नाही रोहीत्रशिरपूरपासून जवळच मिर्झापूर सिंचन प्रकल्प असून मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानाही केवळ विजेअभावी शेतकºयांना सिंचनाचा लाभ मिळेनासा झाला आहे. दरम्यान, शिरपूर येथील शेतकरी गोपाल देशमुख, दिलीप बाविस्कर, हसन गवळी, सुरेश डुकरे, कैलास बाविस्कर व विठ्ठल काळे यांनी दोन महिन्यांपूर्वी रोहित्रासाठी दीड लाख व विद्यूत खांबांसाठी लागणारे १.१० लाख असे एकूण २.६० लाख रुपये भरूनही केवळ ‘टेस्टिंग रिपोर्ट’ न मिळाल्याने रोहित्र मिळू शकले नाही.मिर्झापूर सिंचन प्रकल्पामध्ये मुबलक प्रमाणात जलसाठा असतानाही सिंचनासाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. रोहित्र बसवून मिळावे, यासाठी महावितरणकडे आम्ही सहा शेतकºयांनी महिनाभरापूर्वी २.६० लाखांचा भरणा केला; मात्र ’टेस्टिंग रिपोर्ट’ मिळाला नसल्याने रोहित्र बसवू शकत नाही, असे ठेकेदाराचे म्हणणे आहे. यामुळे सिंचनाचा प्रश्न भेडसावत असून नुकसान होत आहे.- विठ्ठलराव काळेशेतकरी, शिरपूरजैनजिल्ह्यातील विद्यूत रोहित्र बसविण्याचे काम करणाºया ठेकेदारांनी विद्यूत वाहिनी आणि खांब उभारल्यानंतर रोहित्र स्थापित करण्यापूर्वी त्यात कुठल्याही अडचणी नसल्याबाबत सखोल चौकशी व तपासणी करावी लागते. या प्रक्रियेत प्रशासनाकडून कुठलीही हयगय केली जात नाही. सद्य:स्थितीत अशी केवळ ६० प्रकरणे प्रलंबित असून ती देखील लवकरच निकाली काढण्यात येतील.- सारंग नाईविद्यूत निरीक्षक, महावितरण, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण