शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मुद्रा बँक’ योजनेतून कर्ज मिळण्यास लागतोय विलंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 14:41 IST

स्थानिक पातळीवरील बँकांकडून कर्ज देण्याबाबत टाळाटाळ केली जात असून दाखल प्रकरणे निकाली काढायलाही विलंब केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सुशिक्षित तसेच ज्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा आहे, अशा सर्व घटकांसाठी शासनाने प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेंतर्गंत कर्ज वाटपाची सुविधा दिली. मात्र, स्थानिक पातळीवरील बँकांकडून कर्ज देण्याबाबत टाळाटाळ केली जात असून दाखल प्रकरणे निकाली काढायलाही विलंब केला जात आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत, गरजू आणि होतकरू बेरोजगारांना स्वत:चा हक्काचा व्यवसाय सुरू करता यावा, या उद्देशाने शासनाने प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना अंमलात आणली. या योजनांमधील यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी १४ जून २०१६ च्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समित्यांचे गठण करण्यात आले.योजनेचा प्रचार व प्रसार युद्धस्तरावर व्हावा, यासाठी जिल्ह्यांच्या मागणीनुसार जिल्हास्तरीय समित्यांना भरीव निधी देखील उपलब्ध करून दिला जातो. मात्र, याऊपरही मुद्रा बँक योजनेचा जिल्हास्तरावर ना योग्यप्रकारे प्रचार होत आहे ना गरजू, होतकरू व्यक्तींना बँकांकडून वेळेवर कर्ज मिळत आहे. वारंवार बँकांचे उंबरठे झिजवून तसेच आवश्यक सर्व कागदपत्रांची पुर्तता करूनही कर्ज देण्यासंबंधी बँकांकडून उदासिनता बाळगली जात असल्याने बेरोजगार व्यक्तींमधून रोष व्यक्त होत आहे. 

प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी. गरजू व होतकरूंना विनाविलंब कर्जपुरवठा केला जावा, असे निर्देश जिल्ह्यातील सर्व बँकांना दिले आहेत. त्याचा वेळोवेळी आढावा देखील घेतला जातो. लाभार्थींच्या तक्रारी असल्यास त्यांनी त्या सादर कराव्या. त्याची निश्चितपणे दखल घेतली जाईल.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमPradhan Mantri Mudra Yojanaप्रधानमंत्री मुद्रा योजना