शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

मदत वाटपातील दिरंगाई अधिकाऱ्यांना भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 14:52 IST

दिरंगाई झाल्यास तात्पुरता गैरप्रकार समजून संबंधित जबाबदार अधिकाºयावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात २७ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, पीक नुकसानापोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी पहिल्या टप्प्यातील ५६ कोटी ५१ लाख २० हजार रूपयांचा निधी शासनाकडून जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. तो आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नेमलेल्या सहाही तालुक्यांच्या तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आला आहे. या मदतनिधीचे वाटप करून तसा अहवाल ५ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून यात हयगय अथवा दिरंगाई झाल्यास तात्पुरता गैरप्रकार समजून संबंधित जबाबदार अधिकाºयावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने करून जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे नुकसानाचा अंतीम अहवाल सादर केला. त्यानुसार, २ लाख ५९ हजार ७०१ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबिन, २० हजार ६३५ हेक्टरवरील कपाशी, १३३३ हेक्टरवरील तूर, २२२२ हेक्टरवरील भाजीपाला, १७४ हेक्टरवरील पपई, १११ हेक्टरवरील हळद, ४९४ हेक्टरवरील संत्रा, २७ हेक्टर लिंबू, ६५ हेक्टरवरील डाळींबाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले असून २ लाख ५० हजार ३५० बाधीत शेतकºयांना नुकसानभरपाईपोटी १९७ कोटी ८९ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीची गरज असल्याचा अंतीम अहवाल विभागीय आयुक्त व शासनाकडे सादर करण्यात आला. दरम्यान, या अहवालावरून जिल्ह्यातील बाधीत शेतकºयांना अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानापोटी आर्थिक मदत करण्यासाठी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठीकीतील निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात ५६ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. हा निधी कोषागार कार्यालयामार्फत तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला असून तहसीलदारांनी सदर निधी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या खात्यात बँक खात्यात निकषानुसार जमा करावयाचा आहे. या प्रक्रियेत बरेचदा संबंधित बँका शेतकºयाचे नाव, खाते क्रमांक किंवा आधार क्रमांक जुळत नसल्याचे कारण समोर करून प्राप्त निधी निलंबन खात्यात जमा ठेवतात. प्रत्यक्षात असा निधी संबधित संवितरण किंवा आहरण अधिकाºयांच्या खात्यात ठेवणे आवश्यक असताना बँका तसे करित नाहीत व संबधित संवितरण, आहरण अधिकारी देखील त्याची माहिती घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे.या चुकीच्या प्रकारामुळे शेतकºयांना देय असलेला मदतनिधी वेळेत प्राप्त होत नसल्याने प्रशासनाविरूद्ध नाहक रोष निर्माण होतो. यासोबतच प्रक्रियेतील नेमके दोषही लक्षात येत नाहीत. ही अडचण टाळण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी सर्व संबधित संवितरण, आहरण अधिकाºयांना १९ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून उपरोक्त बाबीची काळजीपूर्वक दक्षता घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, निधी वितरणाची कार्यवाही पूर्ण करून ५ डिसेंबरपर्यंत त्याबाबतचा सुस्पष्ट अहवाल जिल्हा प्रशासनास पाठवावा लागणार आहे. यात दिरंगाई झाल्याचे लक्षात आल्यास तात्पुरता गैरव्यवहार समजून संबंधित संवितरण, आहरण अधिकाºयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी पत्रात नमूद केले आहे.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी